बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

पत्नीच्या खुलास्यानं सोलापूर हादरलं, अश्लील व्हिडीओ पाहून पती…

सोलापूर | विवाहानंतर हुंड्याच्या (Dowry) कारणावरून नवविवाहितेचा छळ केल्याच्या घटना आजही मोठ्या प्रमाणात घडत आहेत. विविध वस्तूंची  मागणी करून नवविवाहितेचा छळ केला जातो. त्यातच आता सोलापूर जिल्ह्यातील एक धक्कादायक घटना समोर आली आहे. (Shocking incident in Solapur district)

पती अश्लील व्हिडीओ (Pornographic videos) पाहून पत्नीला अनैसर्गिक शारिरीक संबंधाची (Unnatural Sex) मागणी करत होता. पत्नीने जर विरोध दर्शविला तर पत्नीला वारंवार मारहाण करायचा. तसेच नविन फ्लॅट घेण्यासाठी माहेरकडून 9 लाख रूपये घेऊन ये, अशी मागणीही करत होता. पतीप्रमाणेच सासू, दोन नणंद आणि पतीचा मामादेखील विवाहितेला मानसिक त्रास देत होते.

23 वर्षीय महिलेचा शारिरीक आणि मानसिक छळ केल्यामुळे पती, सासू, दोन नणंद आणि मामाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विवाहित पीडितेला तु या घरात राहायचे नाही. हे घर माझं आहे, असं पती आणि पतीच्या मामाकडून धमकावण्यात येत होते.

दरम्यान, नवविवाहितेला सुरूवातीचे पंधरा दिवस व्यवस्थित नांदविले. मात्र, किरकोळ कारणावरून नववधूचा छळ करण्यास सुरूवात केली. घरातील कामावरून घालून पाडून बोलणे, तुझ्या आईवडिलांनी आमचा पाहुणचार केला नाही, सोनं दिलं नाही,  असं विवाहीत पीडितेला वारंवार सुनावलं जात होतं. यामुळे सततच्या मानसिक छळामुळे आणि पतीने अनैसर्गिक शारिरीक संबंधाच्या मागणीमुळे  सासरच्यांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

थोडक्यात बातम्या- 

निवडणूक जिंकली मात्र घरच्यामुळे आयुष्याची लढाई हरली, उचललं टोकाचं पाऊल

नाना पटोलेंचा महाविकास आघाडीला दणका, स्वबळावर निवडणूक लढवण्याचे आदेश

अनिल देशमुखांना मोठा दिलासा?, परमबीर सिंहांबाबत धक्कादायक माहिती उघड

राज्याच्या राजकारणात नवे संकेत, फडणवीस-ठाकरेंचा ‘तो’ व्हिडीओ व्हायरल

खासदार असदुद्दीन ओवेसींनी वाहतुकीचा नियम मोडल्याने भरावा लागला 200 रुपयांचा दंड

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More