बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

धक्कादायक! पुण्यातील कोरोना रुग्णसंख्येत वाढ, ‘इतक्या’ नव्या रुग्णांची नोंद

पुणे | कोरोना महामारीनं राज्यात थैमान घातलं आहे. कोरोनाचा कहर संपत नाही तोच ओमिक्राॅननं डोकं वर काढलं आहे. पुण्यात ओमिक्राॅनचे सर्वाधिक रुग्ण असल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे दिवसेंदिवस कोरोनाच्या रुग्णसंख्येत भर पडत चालली आहे.

गेल्या 24 तासात पुण्यात तब्बल 1 हजार 104 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. या वाढत्या रुग्णसंख्येमुळे आरोग्य यंत्रणांचीही चिंता वाढली आहे. मागील आठवडाभरात सक्रीय रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणात वाढली असून त्यात 80 टक्क्यांपर्यंत रुग्ण हे लशीचे दोन्ही डोस घेतलेले आहेत. मात्र, प्रत्यक्ष रुग्णालयात दाखल करावे लागणाऱ्या रुग्णांची संख्या तुलनेने कमी आहे.

ओमिक्राॅनच्या रुग्णांमध्येही वाढ होताना दिसत आहे. त्यामुळे तज्ज्ञांनीही तिसऱ्या लाटेची भीती व्यक्त केली आहे. काही ठिकाणी लाॅकडाऊनही करण्यात आलं आहे.

दरम्यान, किती महिने उलटून गेले तरी शहरातील कोरोनाची लाट अद्याप कायम आहे. यामुळे शहराला कोरोनामुक्तीच्या दिशेनं वाटचाल करायची असल्यास आता सरकार, प्रशासन, आरोग्य यंत्रणा यांच्या समन्वयातून तातडीनं उपाययोजना करणं गरजेचं आहे.

थोडक्यात बातम्या – 

मोठी बातमी! पुण्यातील 1 ली ते 8 वीच्या शाळा बंद

धक्कादायक! राज्यात तब्बल दोन डझन नेत्यांना कोरोनाची लागण, ‘या’ नेत्यांचा समावेश

“आपको हमारे जैसे हजारो मिलेंगे, पर…”; स्टोरी ठेवत तरुणानं उचललं ‘हे’ धक्कादायक पाऊल

“सरकारच्या हातालाच नव्हे तर बुद्धीलाही लकवा मारलाय”

‘या’ प्रसिद्ध कंपनीचे फोन आजपासून होणार बंद, वाचा सविस्तर

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More