बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

धक्कादायक! बूस्टर डोस घेऊनही Omicronची लागण

नवी दिल्ली | कोरोनाचा नवीन व्हेरियंट ओमिक्राॅननं (Omicron) सध्या डोकं वर काढलं आहे. ओमिक्राॅनचा वाढता संसर्ग पाहता सगळकीडे चिंतेचं वातावरण निर्माण झालं आहे. अशातच लसीकरणही यावर काही परिणाम करत नसल्यानं आणखी चिंता वाढली आहे.

अमेरिकेतून भारतात आलेल्या 29 वर्षीय व्यक्तीला कोरोनाच्या ओमिक्रॉन व्हेरियंटची लागण झाल्याचे आढळून आलं. धक्कादायक बाब म्हणजे या व्यक्तीनं फायझर कोरोना लसीचे तीनही डोस म्हणजेच बूस्टर डोस घेतले होते. तरीही ओमिक्राॅनची बाधा झाली.

विमानतळावर कोरोना चाचणी करण्यात आल्यावर या व्यक्तीचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता. मात्र, त्या व्यक्तीमध्ये करोनाची कोणतीही लक्षणे नाहीत. या व्य्कतीच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींचीही चाचणी निगेटिव्ह आली.

दरम्यान, कोरोनाचा उद्रेक होताना दिसत आहे. दिवसागणिक संसर्ग वाढत चालला असून रुग्णसंख्येत वाढ होत आहे. संसर्ग असाच वाढत राहिला तर देशाला तिसऱ्या लाटेला सामोरं जावं लागू शकतं.

थोडक्यात बातम्या – 

‘संजय दत्त यांनी आयुष्यात अनेक संकटांचा सामना केला पण…’; गडकरी म्हणतात…

उठ मराठ्या उठ! महाराजांच्या पुतळ्याचा अवमान केल्याप्रकरणी संजय राऊतांचा भाजपवर हल्लाबोल

‘…नाही तर राज्य अंधारात जाईल’; अशोक चव्हाण यांचा गंभीर इशारा

संतापजनक! छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचा अवमान, शिवप्रेमी आक्रमक

‘त्रास देणाऱ्या सरकारला चांगलाच धडा शिकवा’ म्हणत एसटी कर्मचाऱ्यानं उचललं ‘हे’ धक्कादायक पाऊल

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More