बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

धक्कादायक! पुणे नगरसेवकांचा भोंगळ कारभार उघड, पालिकेच्या पैशांवर सुरू आहेत ‘ही’ कामे

पुणे | मंगळवारी पुणे महानगरपालिकेच्या स्थायी समितीची बैठक स्थायी समितीचे अध्यक्ष हेमंत रसाने यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकीत अनेक महत्वाच्या मुद्यांवर चर्चा झाली. त्याबरोबरंच आजच्या बैठकीत पुणे महानगरपालिकेतील काही नगरसेवकांचा भोंगळ कारभार देखील उघडकीस आला आहे.

पुणे महानगरपालिका हद्दीमध्ये काही गावांचा नव्याने समावेश करण्यात आला आहे. एकिकडे नव्याने समाविष्ट झालेल्या या गावांना मोफत पाणीपुरवठा करण्याचा संकल्प करणारे होर्डींग्ज काही नगरसेवकांनी लावले आहेत. तर दुसरीकडे महानगरपालिकेत वर्गीकरणातून या भागासाठी पाणीपुरवठा करण्यासाठी 90 लाख रुपयांचा निधी मिळावा म्हणून अर्ज केला आहे. यामुळे या नगरसेवकांचा भोंगळ कारभार उघड झाला आहे.

आजच्या झालेल्या बैठकीत नगरसेवकांकडून 20 लाखांचे तीन तर 30 लाखांचा एक असे तब्बल 90 लाखांचे प्रस्ताव मान्यतेसाठी सादर करण्यात आले होते. मात्र, स्थायी समितीने या प्रस्तावांना मान्यता दिली नाही. हे प्रस्ताव एक महिन्यासाठी पुढे ढकलण्यात आले आहेत.

याविषयी बैठकीत बोलताना हेमंत रसाने म्हणाले की, पुणे महानगरपालिका हद्दीमध्ये नव्याने समाविष्ट करण्यात आलेल्या प्रभाग क्रमांक 9 मधील गावांना पिण्याचे पाणी देण्याची जबाबदारी महापालिकेची आहे. ती जबाबदारी पालिका पूर्ण करेल.

थोडक्यात बातम्या –

हाच खरा बाहुबली! डोक्यावर दुचाकी उचलणाऱ्या तरूणाचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल

दिलासादायक! मुंबईची वाटचाल कोरोनामुक्तीकडे, वाचा आजची आकडेवारी

‘एवढी सगळी लफडी केलीस पण मला कळू दिलं नाहीस’; शिल्पा शेट्टी राजवर भडकली

‘राज्यपालपदावर असताना राजकारणाची एवढीच खुमखुमी असेल तर…’; नाना पटोलेंची राज्यपालांवर टीका

आनंदाची बातमी! पुण्यातील नव्या कोरोनाबाधितांच्या संख्येत लक्षणीय घट, वाचा आजची आकडेवारी

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More