Top News महाराष्ट्र मुंबई

मुंबई-पुण्यात कोरोनाच्या रुग्णांची धक्कादायक नोंद, जाणून घ्या आजची आकडेवारी!

Photo Credit-Pixabay

मुंबई | गेल्या काही दिवसांपासून कोरोनाग्रस्त रूग्णांच्या संख्येत वाढ होण्याचं प्रमाण वाढलं आहे. पुण्यात आज दिवसभरात 527 पॉझिटीव्ह रुग्णांची वाढ झाली आहे. तर दिवसभरात 280 रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. पुण्यात कोरोनाबाधीत 7 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यातील 3 रूग्ण पुण्याबाहेरील आहेत तर 159 क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

पुण्यात एकूण पॉझिटिव्ह रूग्णसंख्या 196916 असून पुण्यातील ॲक्टिव्ह रुग्ण संख्या 2399 आहे. एकूण 4816 जणांचा मृत्यु झाला आहे. आजपर्यंतच एकूण 189701 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. मुंबईत गेल्या महिनाभराच्या तुलनेत 823 नवीन रूग्णांची वाढ झाली आहे. मुंबईमध्ये 1 फेब्रुवारीला लोकलसेवा चालू करण्यात आली होती. तेव्हा लोकलमध्ये दिवसेंदिवस गर्दीचं प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढलं त्यामुळे रूग्णसंख्या वाढतच चालली आहे. मात्र महापालिकेला मृत्युचा आकडा कमी ठेवण्यात यश आलं आहे.

शुक्रवारी 440 रूग्ण कोरोनामुक्त झाले तर पाच जणांना आपला प्राण गमवावा लागला. यामध्ये चार पुरूष आणि एका महिलेचा समावेश होता. याच पार्श्वभूमीवर राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी नागरिकांना मास्क लावण्याबाबत आणि सॅनिटाईझ करण्याचं आवाहन केलं आहे.

दरम्यान, राज्यात आज दिवसभरात कोरोनामुळे 44 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यातील एकूण कोरोनाबाधितांचा आकडा आता 20 लाख 87 हजार 632 इतका झाला आहे. तर  राज्यात सध्या 2 लाख 24 हजार 087 व्यक्तींना होम क्वारंटाईन करण्यात आलेलं आहे. 1 हजार 588 व्यक्तींना संस्थात्मक क्वारंटाईन करण्यात आलं आहे, अशीही माहिती राज्य सरकारने दिली आहे.

थोडक्यात बातम्या-

कोरोनामुळे ‘या’ शहरात पुन्हा कडक निर्बंध, अंत्यविधीला फक्त 20 जण तर हॉटेल्स

राष्ट्रवादीचा ‘हा’ आमदार सरकारलाच नडला, गुन्हा दाखल झाला पण शिवजयंती साजरी केलीच!

कोरोना रुग्णांची संख्या वाढतेय पण प्रसिद्ध डॉ. तात्याराव लहानेंनी दिली दिलासादायक माहिती

लाल महालासमोर गायला पोवाडा, या प्रसिद्ध शाहीराला पुण्यात अटक

जिओकडून सर्वात स्वस्त प्लॅनची घोषणा, अनलिमिटेड कॉलिंगसह नेटही मिळणार!

‘सरकारचं शिवाजी महाराजांवरचं प्रेम डुप्लिकेट कारण…’; निलेश राणेंची टीका

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या