नवी दिल्ली | गेल्या ६ वर्षात ग्रामीण युवकांच्या बेरोजगारीत ३ पटींनी वाढ झाली आहे. केंद्रीय सांख्यिकी मंत्रालयाच्या आकडेवारीतून ही धक्कादायक माहिती समोर आली आहे.
मंत्रालयाच्या आकडेवारीनूसार २०११-१२ मध्ये १५ ते २९ वर्गातील युवकांमध्ये बेरोजगारीचा दर ५ टक्के होता, तोच दर २०१७-१८ मध्ये वाढून १७ टक्के झाला आहे.
आतापर्यंत ग्रामीण भागातील युवकांच्या बेरोजगारीचा दर शहरी भागातील युवकांच्या तुलनेत कमी असे. मात्र आता तो शहरी युवकांपेक्षा अवघा एका टक्क्याने कमी आहे.
ग्रामीण भागातील युवकांमध्ये शिक्षणाचा स्तर उंचवला, त्यामुळे शेती कामात त्यांचा हिस्सा घटला असून त्याचा परिणाम बेरोजगारी दरावर झाल्याचं सांगितलं जातंय.
महत्वाच्या बातम्या
-भारतीय हवाई दलाच्या बेपत्ता विमानाची माहिती देणाऱ्यास बक्षिसाची घोषणा
-सांगलीत भाजप कार्यकर्त्यांची धारदार शस्त्राने वार करुन हत्या
-पराभव पाहण्याआधी मी मेलो का नाही…- चंद्रकांत खैरे
-पुण्याच्या श्रावणला तर लातूरच्या रोहितला सर्व विषयात 35 गुण!
-राहुल शेवाळेंचा संवेदनशीलपणा; खासदारकीचं पहिलं वेतन दिलं दुष्काळग्रस्तांना
Comments are closed.