बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

धक्कादायक! मुलानं आत्महत्या केली तिथेच आईनेही आयुष्य संपवलं

सोलापूर | सोलापूर जिल्ह्यातील गणपती घाट भागात अतिशय हृदयद्रावक घटना समोर आली आहे. एका महिलेनं तलावात उडी घेत आत्महत्या केल्याचं समोर आलं आहे. धक्कादायक म्हणजे 3 महिन्यापुर्वी याच भागात संबंधीत महिलेच्या मुलानं आत्महत्या केली होती. ही घटना समोर येताच परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

सोलापूर जिल्ह्यातील गणपती घाट येथील सिद्धेशवर तलावात एका अज्ञात महिलेचा मृतदेह आढळला होता. बसवराज कोळी नेहमीसारखे सकाळी गणपती घाट येथे दर्शनासाठी आले होते. त्यावेळी त्यांना तलावात एका महिलेचा मृतदेह तरंगताना दिसला. त्यांना कल्पना आली की संबंधित महिलेनं आत्महत्या केली असावी. त्यांनी तात्काळ पोलिसांना आणि अग्निशमन दलाला फोन करून घटनेची माहिती दिली. माहिती मिळताच घटनास्थळी पोलीस दाखल झाले. त्यानंतर लगेचच अग्निशमन दल आणि वैद्यकीय मदत कक्षातील कर्मचाऱ्यांच्या मदतीनं मृतदेह बाहेर काढून पंचनामा करण्यात आला आहे.

आत्महत्या केलेल्या 40 वर्षीय मृत महिलेचं नाव शारा भीमराव कोळी असल्याचं समोर आलं आहे. त्या सोलापूरमधील जम्मा वस्ती भागात राहत होत्या. अधिक चौकशी केल्यानंतर मिळालेल्या माहितीनं सगळेच हैराण झाले आहे. 31 डिसेंबर रोजी शारा कोळी यांच्या मुलानं काही कारणानं गणपती घाट भागातच आत्महत्या केली होती.

दरम्यान, मुलानं आत्महत्या केल्यामुळं शारा कोळी यांचं मानसिक संतुलन बिघडलं होतं. त्यातूनच त्यांनी हे पाऊल उचललं आणि मुलानं आत्महत्या केली त्याच ठिकाणी शारा कोळी यांनी आपलं जीवन संपवलं. तसेच या ठिकाणी सातत्यानं घडणाऱ्या या घटना विचारात घेऊन आता तलावाला संरक्षक जाळी किंवा भिंत बसवण्यात यावी, अशी मागणी केली जात आहे.

थोडक्यात बातम्या

“नरेंद्र मोदींनी छळ केल्यानेच सुषमा स्वराज आणि अरुण जेटली यांचा मृत्यू झाला”

‘लॉकडाऊन लागलं तर आम्ही पूर्णपणे कोलमडून पडू’; भरत जाधव यांनी मुख्यमंत्र्यांना केली ‘ही’ विनंती

राज्यात एकाच दिवशी तब्बल 3 लाखांहून अधिक नागरिकांना कोरोना लस; राजेश टोपेंनी दिली महत्वाची माहिती

‘राहुल गांधी फक्त मुलींच्याच कॉलेजला भेट देतात’; ‘या’ नेत्याचं वादग्रस्त वक्तव्य

अभिनेत्री आलिया भट्टला कोरोनाची लागण!

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More