बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

बाप नाही हैवान… मुलीसोबत जे कृत्य केलं त्यानं सारं यवतमाळ हादरलं

यवतमाळ | यवतमाळमध्ये काळजाचा थरकाप उडवणारी घटना घडली आहे. 28 वर्षीय तरूणीची आत्महत्या भासवून खून केल्याचं समोर आलं आहे. दृश्यम चित्रपट आणि क्राईम पेट्रोलमधील घटनांचा आधार घेत मृत तरूणीचे कुटुंबीय वारंवार पोलिसांची दिशाभूल करत होते. मात्र, पांढरकवडा पोलिसांनी अवघ्या 72 तासात या प्रकरणाचा छडा लावत वडील, भाऊ यांच्यासह एका नातेवाईकाला अटक केली आहे.

यवतमाळ जिल्ह्यातील केळापुर तालुक्यातील पेंढरी शेत शिवारातील विहिरीत मृतावस्थेत सापडलेल्या तरूणीने आत्महत्या केल्याचा संशय व्यक्त केला जात होता. मात्र, पोलिसांनी या प्रकरणाचा भांडाफोड केला. रेखाच्या डाव्या हाताला एका कापडी पिशवीत बांधलेली एक चिठ्ठी आणि जिओ कंपनीचं सीमकार्ड मिळालं होतं. त्यानंतर, रेखाचा मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी उपजिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आला होता. या प्रकरणाचा तपास करताना धक्कादायक माहिती समोर आली आहे. गळा आवळून हत्या केल्यानंतर तिचा मृतदेह पाण्यात टाकल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे. त्यानुसार पोलीस हवालदार राहुल खंडागळे यांनी अज्ञात आरोपीविरोधात पोलीस स्टेशनमध्ये तक्रार देऊन कलम 302, 201 अंतर्गत हत्येचा गुन्हा दाखल केला आहे.

तिन्ही आरोपींनी त्यांची सामाजिक प्रतिष्ठा राखण्यासाठी ही हत्या केली होती. आरोपी विलास मरापे यानी रेखाला पेंढरी शेत शिवारात नेलं. सोबत आणलेल्या दोरीने गळा आवळून तिची हत्या केली. आपल्यावर संशय येऊ नये म्हणून तिच्या हस्ताक्षरात लिहिलेली चिठ्ठी तिच्या हाताला बांधून तिला विहिरीत ढकलून दिलं. पुरावे नष्ट करत खुनाची घटना घडलीच नाही, अशी नाट्यमय परिस्थिती त्यांनी निर्माण केली. दोन दिवस ते आपले नियमित काम करत राहिले. मात्र, पांढरकवडा पोलिसांनी तपास करून खुनाचा 72 तासात छडा लावला.

दरम्यान, ही हत्या झाल्याची खात्री पटल्यानं संशयित म्हणून रेखाचे वडील विलास मरापे, भाऊ हिरामण मरापे, मेहुणा सुभाष मडावी यांना ताब्यात घेतलं आहे. त्यांना अटक करुन 16 एप्रिल रोजी न्यायालयाकडून अधिक तपासासाठी वेगवेगळ्या पद्धतीनं विचारपूस केली. तेव्हा हा गुन्हा आपणच केल्याची कबुली आरोपींनी दिली आहे.

थोडक्यात बातम्या

मुळशी पॅटर्नची नागपुरात पुनरावृत्ती; भर रस्त्यावर ‘लेडी डॉन’ची पळूपळून हत्या

अभिमानास्पद! ग्लोबल टीचर डिसले गुरुजींच्या नावाने परदेशात शिष्यवृत्ती सुरू

चेन्नईच्या विजयानंतर जडेजाचं भन्नाट सेलिब्रेशन; व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल

देशातील पहिल्या ‘ऑक्सिजन एक्सप्रेस’ला अनिल परबांनी दाखवला हिरवा झेंडा

“देवेंद्र फडणवीसांच्या 45 वर्षांपेक्षा कमी वयाच्या पुतण्याला लस मिळतेच कशी?”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More