बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

लठ्ठ व्यक्तींना आधी कोरोनाची लस द्यावी की नाही?, जगात सुरु आहे नवा वाद

मुंबई | कोरोना लसीकरण सुरू झाल्यानंतर केवळ भारतातच नव्हे तर संपूर्ण जगभरात प्राधान्यक्रम ठरवण्यात आला आहे. कोणाला आधी लसीकरण करायचं आणि कोणाला नंतर हे त्या क्रमाद्वारे ठरवण्यात आलं आहे. भारतात सगळ्यात आधी आरोग्य कर्मचारी, फ्रंटलाइन वर्कर्स आणि त्यानंतरच्या टप्प्यात 60 वर्षांवरील नागरिकांना आणि अन्य व्याधी असलेल्या 45 वर्षांवरील नागरिकांना लस देण्यात आली. पुढील टप्प्यात 1 एप्रिलपासून 45 वर्षांवरच्या सर्व नागरिकांचं लसीकरण केलं जाणार आहे. काही देशांमध्ये लठ्ठ व्यक्तींना लस प्राधान्याने देण्याचा निर्णय झाला आहे. मात्र, त्यावरून वाद निर्माण झाले आहेत.

75 वेगवेगळ्या अभ्यासांमधली माहिती घेऊन केलेल्या विश्लेषणाच्या आधारावर लठ्ठपणाने त्रस्त असलेल्या व्यक्तींना कोविड-19 च्या संक्रमणाचा धोका तर जास्त आहेच. पण कोरोनाची लागण झाल्यानंतर हॉस्पिटलमध्ये दाखल झाल्यानंतर अतिदक्षता विभागात दाखल करावं लागण्याची आणि मृत्यू होण्याची शक्यताही त्यांच्या बाबतीत देखील जास्त आहे, असं तंज्ञांनी म्हटलं आहे.

लठ्ठ व्यक्तींना प्राधान्याने लस दिली जायला हवी. अमेरिका आणि कॅनडामध्ये बॉडी मास इंडेक्स 40 पेक्षा अधिक असलेल्या व्यक्तींना या गटात ठेवण्यात आलं असून, त्यांचा लसीकरणासाठी प्राधान्याने विचार केला जाणार आहे. BMI वरूनही वाद आहेत. मात्र, सोयीसाठी एक निकष हवा म्हणून तो ठेवण्यात आला आहे, असं या अभ्यासाच्या आधारे ठरवण्यात आलं आहे.

दरम्यान, 50 वर्षांपूर्वी डिप्रेशनचा त्रास असता तर लोक म्हणाले असते, की मजा-मस्ती करा. पण आता गंभीर प्रकारचं डिप्रेशन ही एक अशी वैद्यकीय स्थिती आहे ज्यावर वैज्ञानिक दृष्टिकोनातून इलाज शक्य आहे. लठ्ठपणाच्या बाबतीतही तेच तत्त्व लागू होतं. अनेक मानसिक समस्यांचं मूळ लठ्ठपणात असल्याचंही दिसून आलं आहे. लठ्ठ व्यक्तींनी संकोच न करता लस घेतली पाहिजे, असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे.

थोडक्यात बातम्या – 

बाळासाहेबांच्या स्मारकाच्या भूमिपूजनात एकनाथ शिंदेंना डावललं; भाजप नेत्याचं प्रश्नचिन्ह!

शरद पवारांवर शस्त्रक्रिया; राणे पिता-पूत्रांनी गाठलं ब्रीच कँडी रुग्णालय

मित्राच्या गर्लफ्रेंडला घरी बोलावून दारु पाजली, त्यानंतर केला बलात्कार!

शस्त्रक्रियेनंतर शरद पवार ठणठणीत, फोटो ट्विट करत सुप्रिया सुळे म्हणाल्या…

राष्ट्रवादीविरोधात केलेली बंडखोरी भोवली, ‘या नेत्याची शिवसेनेतून हकालपट्टी

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More