बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

लसीकरण करताना दोन वेगवेगळ्या कंपनीचे डोस घ्यावेत का?; डाॅक्टरांनी दिला ‘हा’ सल्ला

नवी दिल्ली | जानेवारीपासून देशभरात लसीकरण चालू करण्यात आलं आहे. या लसीकरणाचा सध्या चौथा टप्पा चालू आहे. भारतातील लोकसंख्यामुळे सध्या लसींचा तुटवडा जाणवू लागला आहे. त्यामुळे अनेक जण लसीच्या प्रतिक्षेत आहेत. तर काही जणांना पहिला डोस मिळाला असला तरी दुसऱ्या डोससाठी धडपड करावी लागत आहे. त्यामुळे लोक घाईघाईने निर्णय घेतात. तर काही जण दोन डोस दरम्यान, दोन वेगवेगळ्या कंपन्याचे डोस घेण्याची शक्यता असते. याच मुद्यावर डाॅक्टरांनी एक सल्ला दिला आहे.

दोन वेगवेगळ्या लसींचे डोस कोणत्याही परिस्थितीत एकत्र मिसळले जाऊ नयेत, असं तज्ज्ञ डाॅक्टरांनी सांगितलं आहे. सर्व लसी वेगवेगळ्या प्रकारे बनवल्या जातात, ज्या काम देखील वेगवेगळ्या प्रकारेच करतात. म्हणून अशा वेळी दोन वेगवेगळे डोस एकत्र करणं चांगलं ठरू शकत नाही, असा सल्ला डाॅक्टरांनी दिला आहे.

कोविशील्ड आणि कोवॅक्सिन या एकाच स्वरूपाच्या दोन लसी आहेत, पण कदाचित लस घेतल्यास त्याचे परिणाम चांगले होणार नाहीत. काही लसी त्यांच्यासाठी कमी सुरक्षित किंवा कमी योग्य असल्याचे सिद्ध होऊ शकतात. त्यामुळे साइड इफेक्ट, अँटीबॉडीसह सर्व घटकांची काळजी घेणं महत्वाचं आहे, असं डाॅक्टरांनी म्हटलंय.

दरम्यान, अमेरिकेत सध्या 600 हून अधिक लोकांवर नुकत्याच करण्यात आलेल्या वैद्यकीय अभ्यासानुसार कोविशील्ड आणि फायझर लसीचे एकत्रीकरण करून त्याच्या परिणामांची तपासणी करण्यात आली, परंतू त्यात वैज्ञानिकांना त्यांचा चांगला प्रतिसाद मिळाला नाही.

थोडक्यात बातम्या-

गणेश नाईकांनी सांगितला कोरोनावरील प्रभावी उपाय, म्हणाले…

ब्लॅक फंगसनंतर आता या नवीन बुरशीजन्य आजाराचा धोका; 8 रुग्ण सापडल्यानं खळबळ

“सरकारला काँग्रेस मंत्र्यांसाठी बहुजनांच्या हितापेक्षा दारू विक्रेत्यांकडून मिळणाऱ्या मेव्याचा हेवा”

चंद्रपुरची दारुबंदी नेमकी का उठवली?; सरकारने दिली ‘ही’ 4 कारणे

“पंतप्रधान मोदी आणि भाजपचे नेते मदत करत नसतील तर…”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More