शिवसेनेच्या मंत्र्यांनी पाच वर्षांत केलेली 15 कामे दाखवा- डॉ. अमोल कोल्हे

अलिबाग : मी पुन्हा मुख्यमंत्री होणार असं म्हणत महाजनादेश यात्रा काढणारे मुख्यमंत्री पहिल्यांदाच पाहिले आहेत. पाच वर्ष कामे केली असती तर ही वेळ आली नसती. युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे प्रदुषण मुक्त महाराष्ट्र करण्याची भाषा करत आहेत. मग पर्यावरण मंत्री रामदास कदम काय करत होते? पाच वर्षांत शिवसेनेच्या मंत्र्यांनी केलेली 15 कामे दाखवा, असंं म्हणत खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी शिवसेना भाजपवर टीका केली. ते कर्जत येथे शिवस्वराज्य यात्रे दरम्यान आयोजीत सभेत बोलत होते.

आमची यात्रा कुणाला मुख्यमंत्री करा हे सांगायला नाही तर शिवस्वराज्य आणण्यासाठी आहे. रयतेचं राज्य आणण्यासाठी आहे, असं अमोल कोल्हे यांनी म्हटलं आहे.

राज्यात पाच वर्षांत 983 कारखाने बंद झाले. 1 लाख 43 हजार लहान मोठे उद्योग बंद झाले. यामुळे अनेक लोक बेरोजगार झाले. मुख्यमंत्री यावर काही बोलायला तयार नाहीत. शेतकरी आत्महत्या, कर्जमाफी विषय काढले याबद्दलही बोलायला तयार नाहीत. अशी टीका अमोल कोल्हे यांनी केली आहे.

यावेळी खासदार सुनील तटकरे, रुपाली चाकणकर, जिल्हाध्यक्ष दत्ता मसुरकर, जिल्हा परिषद सभापती नरेश पाटील, उमाताई मुंढे, खोपोली नगराध्यक्ष सुमन आवसरमल, अंकित साखरे उपस्थित होते.

महत्त्वाच्या बातम्या –