रत्नागिरी | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2014 साली विदेशातून काळा पैसा आणून भारतीयांच्या खात्यात 15 लाख रुपयं जमा करण्याचं आश्वासन दिलं होतं, ते जमा झालेला एकतरी खातेदार दाखवा?, असा सवाल विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी विचारला आहे. ते राष्ट्रवादी काँग्रेसच्या परिवर्तन यात्रेत खेड येथे बोलत होते.
पेट्रोल आणि गॅसच्या किमती वाढवून नरेंद्र मोदी यांनी देशातल्या प्रत्येक कुटुंबाला लुटलं, असा आरोप देखील धनंजय मुंडे यांनी केला आहे.
2014 च्या लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदी यांनी अच्छे दिन आनेवाले है ही घोषणा दिली होती, आता मात्र ती घोषणा दिली की लोक हसतात, असं धनंजय मुंडे यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, चौकीदार चौर है असं लोकांनी म्हटल्यावर भाजप कार्यकर्त्यांना राग का येतो? असा सवाल देखील धनंजय मुंडे यांनी विचारला आहे.
महत्वाच्या बातम्या-
-उदयनराजे आणि शिवेंद्रराजेंचे कार्यकर्ते ‘या’ कारणासाठी आले एकत्र!
-नगर पॅटर्न आवडे ‘राष्ट्रवादी’ला?; ‘त्या’ नगरसेवकांवर अद्याप कारवाई नाही!
-परिवर्तन यात्रेत अजित पवारांची बैलगाडी; सारथ्य धनंजय मुंडेंच्या हाती!
-कॉफी महागात पडली; हार्दिक पांड्या आणि लोकेश राहुलचं निलंबन
-“आज…देवेंद्र फडणवीसांच्या घाशिराम कोतवालाचा नवा प्रयोग पहायला मिळाला”
Comments are closed.