बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

ज्येष्ठ अभिनेते श्रीकांत मोघे काळाच्या पडद्याआड; मराठी सिनेसृष्टीवर शोककळा…

पुणे | मराठीतील जेष्ठ रंगकर्मी आणि अभिनेते श्रीकांत मोघे यांचं वृद्धापकालाने निधन झालं आहे. ते 91 वर्षांचे होते. मोघे यांनी किर्लोस्करवाडी येथून दहावी पर्यंतच शिक्षण पूर्ण केलं. पुण्यातील सर परशुराम महाविद्यालयातून विज्ञान शाखेत पदवी मिळाल्यावर मोघे नाट्य प्रशिक्षणाकडे वळले.

मराठी चित्रपटसृष्टीतील चाॅकलेट हिरो अशी प्रतिमा असलेले मोघेंना खरी प्रसिद्धी मिळाली ती वाऱ्यावरची वरात या नाटकापासून. बोरटाके गुरूजीचं पात्र त्यांनी असं काही वठवलं की, चिरंतन काळापर्यंत प्रेक्षकांच्या काळजात ते घर करून राहील.

नाटकापासून मोघेंच्या आयुष्याला कलाटणी मिळून गेली. मोघेंनी आपल्या कारकिर्दीत जवळपास 60 हून अधिक नाटकांत तर 50 पेक्षा जास्त चित्रपटात आपल्या अभिनयाची झाप सोडली आहे. एवढंच नव्हे तर मोघेंनी आपल्या नाट्य कारकिर्दीवर आधारित ‘नटरंगी रंगलो’ हे आत्मचरित्रही लिहीलं आहे.

मोघे यांच्या अभिनयाच्या कारकिर्दीला महाराष्ट्रातील अनेक पुरस्कारांनी गौरविण्यात आलं आहे. 2012 साली सांगली येथे पार पडलेल्या 92 व्या मराठी नाट्यसंमेलनाचे अध्यक्षपदही त्यांनी भूषवलं होतं. महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना भालबा केळकर यांच्या बिचारा डायरेक्टर या नाटकांचं दिग्दर्शनही त्यांनी केलं आहे.

थोडक्यात बातम्या –  

पाकिस्तानात हिंदू कुटुंबावर जीवघेणा हल्ला, 5 जणांचा जागीच मृत्यू

“आमदारकीसाठी नव्हे तर शेतकऱ्याला योग्य दाम मिळावा म्हणून आंदोलन”

‘अधिकारी ऐकत नसतील तर त्यांना बांबूने झोडा’; ‘या’ केंद्रीय मंत्र्याचं वादग्रस्त वक्तव्य

आजच्या काळातील ‘झाशीची राणी’; ‘या’ व्हिडीओमुळं तिच्यावर कौतुकाचा वर्षाव

रिलायन्स नंतर आता ‘ही’ कंपनी कर्मचाऱ्यांना देणार मोफत लस

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More