शिवारात लपून बसलेल्या श्रीपाद छिंदमला अखेर अटक

अहमदनगर | छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अपशब्द वापरणारा भाजपचा अहमदनगरमधील बडतर्फ उपमहापौर श्रीपाद छिंदमला अखेर अटक करण्यात आलीय. अहमदनगर पोलिसांनी ही कारवाई केलीय.

छिंदमची ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यापासून शिवप्रेमी त्याच्या मागावर होते. अखेर तो कारमधून पळून जात असताना शिवप्रेमींनी त्याचा पाठलाग केला. त्यानंतर त्याने कार सोडून पळ काढला. सोलापूर रोड परिसरातील शिराडोण शिवारात तो लपून बसला होता. 

दरम्यान, घटनेची माहिती मिळताच स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग घटनास्थळी दाखल झाला. त्यांनी श्रीपाद छिंदमला अटक केली.