बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

भाविकांची प्रतिक्षा संपली; सिद्धीविनायक मंदिराचे दरवाजे अखेर उघडले

मुंबई | कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील मंदिरं बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. कोरोनाचा प्रादुर्भाव ओसरत असल्याने लॉकडाऊन नियमांत शिथीलता देण्यात आली. निर्बंध शिथील केल्यानंतर बंद असलेली अनेक मंदिरं भाविकांसाठी खुली करण्यात आली. लॉकडाऊन संपलं तरी सिद्धीविनायक मंदिर मात्र गेल्या 2 वर्षांपासून बंदच होतं.

तमाम भाविकांचं श्रद्धास्थान असलेलं मुंबईतील सिद्धीविनायक मंदीर मोठ्या प्रतिक्षेनंतर भाविकांसाठी खुलं करण्यात आलं आहे. साधारण 2 वर्ष बंद असलेले सिद्धीविनायक मंदिराचे दरवाजे अखेर भाविकांसाठी उघडले आहेत. आज अंगारकी चतुर्थीच्या मुहूर्तावर सिद्धिविनायक मंदिर भाविकांसाठी खुलं करण्यात आलं आहे. मंदिर उघडताच भाविकांनी सिद्धीविनायकाच्या दर्शनासाठी रांग लावली आहे.

मध्यरात्री 1.30 वाजता सिद्धिविनायकाच्या दर्शनाला सुरूवात झाली आहे. लॉकडाऊननंतर पहिल्यांदाच अंगारकीच्या दिवशी सिद्धिविनायक मंदिर उघडल्याने सिद्धिविनायकाच्या दर्शनासाठी दुरून भाविक येत आहेत. सर्व भाविकांना ऑनलाईन क्यूआर कोड द्वारे मंदिरात प्रवेश दिला जात आहे. तर प्रसादालयासाठीही परवानगी देण्यात आली आहे.

तब्बल दोन वर्षांनी सिद्धिविनायकाचं मंदिर उघडल्याने भाविकांमध्येही उत्साहाचं वातावरण पाहायला मिळत आहे. भाविकांनी मध्यरात्रीपासूनच दर्शनासाठी रांग लावायला सुरूवात केली.

थोडक्यात बातम्या-

भररस्त्यात मुलीने मारल्याने व्हायरल झालेल्या लखनऊच्या कॅब चालकाचा मोठा निर्णय

“किती मर्डर पचवणार हे सरकार?”

अरविंद केजरीवाल पंजाबमधील महिलांना दरमहा देणार 1000 रुपये

पंजाब निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अरविंद केजरीवालांचा रिक्षा प्रवास, पाहा व्हिडीओ

एअरटेल वापरताय तर लवकर रिचार्ज करा; ‘या’ तारखेनंतर प्लॅन 501 रूपयांनी महागणार

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More