ड्रग्ज प्रकरणी पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या सिद्धांत कपूरला 24 तासांच्या आत जामीन!
मुंबई | बाँलिवूड (Bollywood) अभिनेता शक्ति कपूर यांचा मुलगा अभिनेता सिद्धांत कपूरला ड्रग्ज प्रकरणात ताब्यात घेण्यात आलं होतं. मात्र त्याला आता जामीन मिळाला आहे. सिद्धांतला बेंगळुरच्या एका प्रसिद्ध हाँटेलमध्ये ड्रग्स घेताना पकडण्यात आलं होतं.
बेंगळुरच्या एका हाँटेलमध्ये ड्रग्स मिळत असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती. हाँटेलवर धाड टाकली असता, 34 जणांसह सिद्धांत कपूरलाही अटक करण्यात आली. सिद्धांतसह इतर 6 जणांचा वैद्यकीय अहवाल पाँझिटीव्ह आला आहे.
सिद्धांत कपूरला सध्यातरी जामीन मिळाला असून पोलिस चौकशीसाठी मात्र हजर राहण्यासाठी सांगितलं आहे. पोलिसांना हाँटेलमध्ये कोणतेही ड्रग्ज आढळले नाहीत, पण गांजा खाऊन फेकून दिल्याचं दिसून आले असल्याचं पोलिसांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं.
सिद्धांत कपूर हा अभिनेता असुन त्यांने चुपके चुपके, भुल-भुलैय्या या चित्रपटासांठी सहाय्यक दिग्दर्शक म्हणूनही काम केलं आहे. सिद्धांत कपूरच्या अटकेबद्दल त्यांचे वडिल अभिनेता शक्ती कपूर यांना विचारलं असता “हे केवळ अशक्य आहे” अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली होती.
थोडक्यात बातम्या-
राजकारण्यांना सर्वात मोठा झटका?, निवडणूक आयोग हा निर्णय घेण्याच्या तयारीत
मोठी बातमी! पंतप्रधान मोदींच्या देहू दौऱ्यामुळे ‘हे’ महत्त्वाचे मार्ग राहणार बंद
…म्हणून मोदींच्या देहूतील सभेआधी राष्ट्रवादीच्या ‘या’ नेत्याला पोलिसांची नोटीस
राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार राष्ट्रपती होणार?
केंद्रीय मंत्री स्मृती इराणींचे राहुल गांधींवर गंभीर आरोप, म्हणाल्या…
Comments are closed.