बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“समोरा समोर लढता येत नसल्याने पाठीमागून अफजलखानी वार सुरू”

मुंबई | राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांना ईडीकडून अटक करण्यात आली आहे. नवाब मलिकांच्या अटकेनंतर राज्यातील राजकारण चांगलंच तापलं आहे. महाविकास आघाडीचे नेते आणि भाजप यांच्यात जोरदार घमासान सुरू आहे. त्यातच आता शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजपवर जोरदार टीका  केली आहे.

महाविकास आघाडीशी समोरा समोर लढता येत नसल्याने पाठीमागून अफझलखानी वार सुरू आहेत, असा घणाघात संजय राऊत यांनी केला आहे. चालू द्या एक मंत्री कपट करून आत टाकला असे आनंदाचे भरते आले असेल तर येऊ द्या, असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

यावेळी संजय राऊत यांनी नवाब मलिकांचा राजीनामा घेवू नये ,असं म्हटलं आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी नवाब मलिक यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. मुख्यमंत्र्यांनी नवाब मलिकांचा तातडीने राजीनामा घ्यावा, अन्यथा भाजपकडून आंदोलन करण्यात येईल, असा इशारा चंद्रकांत पाटील यांनी दिला आहे. त्यातच संजय राऊत यांनी राजीनामा घेऊ नये, असं म्हटलं आहे.

दरम्यान, लढत राहू आणि जिंकू,असं संजय राऊत म्हणाले आहेत. कंस आणि रावण सुध्दा मारले गेले. हेच हिंदुत्व आहे, असंही त्यांनी म्हटलं आहे. नवाब मलिक यांच्यावरील कारवाई ही केंद्रीय यंत्रणेच्या गैरवापरावरील उदाहरण असल्याचं राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटलं आहे.

थोडक्यात बातम्या-

‘या’ भागात पुन्हा हलक्या सरींची शक्यता, हवामान खात्याचा इशारा

Nawab Malik Arrested | “ही कायदेशीर आणि राजकीय लढाई आम्ही लढू”

अटकेनंतर नवाब मलिक यांची प्रतिक्रिया, म्हणाले “मला जबरदस्तीने…”

दहावी बारावीच्या परिक्षांसंदर्भात सुप्रीम कोर्टानं दिला ‘हा’ महत्त्वाचा निर्णय

“मुख्यमंत्र्यांनी तातडीने नवाब मलिक यांचा राजीनामा घ्यावा, अन्यथा…”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More