सिंधुदुर्गतील ग्रामपंचायतीवर सायबर हल्ला, ३०० डॉलर्सची मागणी

संग्रहित छायाचित्र

सिंधुदुर्ग | सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या मळेवाड ग्रामपंचायतीची संगणक यंत्रणा रेन्समवेअर विषाणूच्या विळख्यात सापडलीय. ही माहिती पुन्हा देण्यासाठी ३०० डॉलरची मागणी करण्यात आलीय. आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरुन ही बातमी प्रसारित करण्यात आली. 

ग्रामपंचायतीतील संगणकांची यंत्रणा अद्ययावत करण्याचं काम सुरु असताना ही बाब निदर्शनास आली. विषाणू घुसल्याने त्यात असलेला ऑफलाईन माहिती पूर्णतः लॉक झाली असून सर्व काम ठप्प झालंय. ग्रामपंचायतीनं याबाबत पोलिसात तक्रार नोंदवल्याचं कळतंय. 

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

तुमच्या पसंतीच्या बातम्या