बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

अनाथांच्या मातेला ‘पद्मश्री’; सिंधुताईंच्या ‘या’ भाषणानं साऱ्यांच्याच डोळ्यात अश्रू

मुंबई | अनाथांची माय सिंधुताई सपकाळ यांना प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे. अनाथांसाठी आपला पदर मोठा करणाऱ्या या मातेला पद्मश्री मिळाल्यानं संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेला आनंद झाला आहे.

सिंधुताई सपकाळ यांना स्वतःच्या आयुष्यात मोठा संघर्ष करावा लागला. अनाथांची माता होण्याआधी त्यांच्या वाट्याला आलेलं दुःख त्या सगळ्यांशी शेअर करत असतात. ती रात्र त्या अजूनही विसरु शकलेल्या नाहीत.

अशाच एका कार्यक्रमात सिंधुताईंना आयुष्याला कलाटणी मिळालेल्या त्या रात्रीचं वर्णन केलं आहे. हा अनुभव आपल्या अंगावर काटा तर आणतोच याशिवाय डोळ्यात अश्रू आणल्याशिवाय राहात नाहीत.

सिंधुताई आज हजारो अनाथ मुलांच्या माता आहेत, मात्र आजही त्या आपल्या या लेकरांसाठी धडपड करताना दिसतात. पद्मश्री मिळाल्याबद्दल ‘थोडक्यात’कडून सिंधुताईंचं खूप खूप अभिनंदन. सिंधुताईंचा संघर्ष समजून घेण्यासाठी खालील व्हिडीओ नक्की पाहा…

पाहा व्हिडीओ-

थोडक्यात बातम्या-

प्रजासत्ताकदिनी पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून शहिदांना आदरांजली

“शौर्य आणि धैर्यासाठीचे मानाचे पदक पटकावून आपल्या बहाद्दरांनी महाराष्ट्राची प्रतिमा आणखी उंचावली”

ट्रॅक्टर परेडमधील शेतकऱ्याला स्टंटबाजी करणं पडलं महागात; पाहा व्हिडीओ

आंतरराष्ट्रीय प्राणी उद्यान उद्घाटनासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे नागपूर दौऱ्यावर

शेतकरी जनसंवादादरम्यान सिंघू सीमेवर काँग्रेसच्या ‘या’ खासदारावर प्राणघातक हल्ला

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More