Top News मनोरंजन

प्रसिद्ध अभिनेत्यावर पुन्हा एकदा लैंगिक अत्याचाराचे आरोप

मुंबई | प्रसिद्ध अभिनेता, गायक अली झफरविरोधात पुन्हा एकदा लैंगिक अत्याचाराचे आरोप करण्यात आले आहेत. मेकअप आर्टिस्ट लीना घानी हिने अलीवर लैंगिक अत्याचाराचे आरोप केले असून तिने याबाबत तक्रार दाखल केली आहे.

अनेक वर्षांपासून अली झफर यांच्याकडून माझ्यावर अत्याचार होत आहे. त्यामुळे आता मी माझ्यासाठी लढायचं ठरवलं आहे. त्यांनी मला कोर्टात जायला सांगितलं त्यामुळे आता मी कोर्टातच त्यांच्याशी लढणार असल्याचं लीना घानीने म्हटलं आहे. यासंदर्भात तिने ट्विट केलं आहे.

लीनापूर्वी एका पाकिस्तानी गायिकेने अली झफरविरोधात लैंगिक अत्याचाराचे आरोप केले होते. लीनाने सिंध उच्च न्यायालयात खटला दाखल करत अलीविरोधात 50 कोटींची नुकसान भरपाई मागितली आहे.

दरम्यान, अली झफर बॉलिवूडमधील बऱ्याच चित्रपटात काम केलं आहे. त्याने तेरे बिन लादेन, लंडन पॅरिस, मेरे ब्रदर की दुल्हन, डिअर झिंदगी या बॉलिवूड चित्रपटांमध्ये काम केले आहे. अलीने बॉलिवूडमधील चित्रपटांमध्ये गायन देखील केले आहे.

 

थोडक्यात बातम्या-

“पवारांचा दुटप्पीपणा महाराष्ट्राची जनता बघत असून राष्ट्रवादीला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही”

लसीवर कोविड योद्ध्यांचा पहिला हक्क- पंतप्रधान नरेंद्र मोदी

“भाषा नीट करा नाहीतर हा निलेश राणे तुमची घमंड उतरवल्याशिवाय राहणार नाही”

लसीकरणाच्या पार्श्वभूमीवर मनसेनी केली मुख्यमंत्र्यांकडं ‘ही’ मागणी

…त्यावेळी ‘ओ साला धनंजय मुंडे’ म्हणत शिवीगाळ करणारे मनीष धुरी आज त्यांच्या पाठीशी- रेणू शर्मा

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या