बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

सुशांतला अशाप्रकारे अपमानित करणं योग्य होतं का?; गायिकेनं शेअर केला धक्कादायक व्हिडिओ

सुशांतसिंग राजपूतच्या आत्महत्येनंतर फिल्म इंडस्ट्री दोन गटात विभागली गेलेली दिसते. बॉलिवूडचा मोठा स्टार असलेल्या अभिनेत्याच्या आत्महत्येबद्दल दुःख व्यक्त करत असताना त्याने असे का केले? असा प्रश्न विचारला जात आहे. तर असे काही स्टार्स आहेत जे बॉलिवूड इंडस्ट्रीत घराणेशाहीला विरोध दर्शवत आहेत आणि हेच सुशांतच्या आत्महत्येचे असल्याचं सांगत आहेत.

अभिनेत्री कंगना रनौत खूपच चिडली आहे. सुशांतची आत्महत्या नियोजित कट असल्याचं तीनं म्हटलं आहे. आता लोकगायिका मालिनी अवस्थी यांनीही बॉलिवूडमधील कंपूशाहीला विरोध करणारा एक व्हिडिओ शेअर केला आहे.

आयफा पुरस्कार सोहळ्यातील हा व्हिडिओ आहे. या व्हिडिओत शाहरूख आणि शाहिदने सुशांतसिंग राजपूतला स्टेजवर कसे बोलावले आणि त्याची खिल्ली कशी उडवली हे पाहता येऊ शकतं. सुशांत दोन्ही स्टार्सची चर्चा ऐकत आहे आणि हसत असल्यासारखे दिसत आहे. प्रेक्षकांमध्येही सर्व हसत आहेत. व्हिडिओ कदाचित बराच जुना असेल, पण सुशांतसिंग राजपूतच्या आत्महत्येनंतर हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

मालिनी अवस्थींनी हा व्हिडिओ त्यांच्या ट्विटर हँडलवर शेअर केला असून कॅप्शनमध्ये बॉलिवूड इंडस्ट्रीला लक्ष्य केलं आहे. “जेव्हापासून हा व्हिडिओ समोर आला आहे तेव्हापासून मी स्तब्ध आहे! करमणुकीच्या नावाखाली असा भयंकर प्रकार! एंकरिंगच्या नावाखाली बड्या कलाकारांच्या पुरस्कार सोहळ्यांमध्ये सुशांतसिंगला अपमानित करणं कसं योग्य आहे?”, असं त्यांनी म्हटलं आहे.

मालिनी यांनी ही पोस्ट्स शेअर केल्यानंतर अनेकजण कमेंटमध्ये मालिनींचं समर्थन करत आहेत. त्याच वेळी बरेचजण असं म्हणत आहेत की हा पूर्ण व्हिडिओ नाही तर संपादित आवृत्ती आहे. जर पूर्ण व्हिडिओ पाहिला तर त्यासुद्धा हसतील. पुरस्कार वितरण सोहळ्यात अशा पद्धतीची थट्टा केवळ करमुकीच्या उद्देशानं केली जाते, असं काहींनी म्हटलं आहे.

ट्रेंडिंग बातम्या-

करण जोहरच्या सिनेमांवर बहिष्कार टाका; सोशल मीडियावर जोरदार मागणी

जामखेडच्या राजकारणात मोठी उलथापालथ, रोहित पवारांचा राम शिंदेंना मोठा धक्का

महत्वाच्या बातम्या-

महाविकास आघाडीत कुरबूर, शिवसेनेचे सामनातून काँग्रेसला चिमटे

कसलीही हौसमौज अन् बडेजाव न करता पार पडला मुख्यमंत्र्यांच्या मुलीचा विवाह सोहळा

“शरद पवारांचं आमंत्रण म्हणजे लबाडाघरचं जेवणं, जेवल्याशिवाय काही खरं नाही”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More