बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“फक्त आवाज द्या, ‘खाकी’ घालून तुमच्या खांद्याला खांदा लावून उभा राहतो”

मुंबई | ‘कोरोना’शी दोन हात करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आर्थिक योगदान देण्याचं आवाहन केलं आहे. बॉलिवूड कलाकारांपासून सर्वसामान्य नागरिकांनी आपापल्या परीने मदतीचा हात दिला आहे. अभिनेता अजय देवगन याने ट्वीट करत मुंबई पोलिसांच्या जोडीने मैदानात उतरण्याची तयारी दर्शवली आहे.

प्रिय मुंबई पोलिस, तुम्ही जगातील सर्वोत्कृष्ट म्हणून ओळखले जाता. कोविड 19 साथीच्या काळात तुमचे योगदान अतुलनीय आहे. आपण हाक द्या, हा ‘सिंघम’ आपली ‘खाकी’ घालून आपल्या बाजूला उभा राहील. जय हिंद, जय महाराष्ट्र’, असं जय देवगणनं केलं आहे.

कोरोनाविरोधात लढण्यासाठी अजय देवगणनेची 25 कोटी 51 लाखांची मदत केली आहे. पीएम केअर फंडसाठी 15 कोटी, महाराष्ट्र मुख्यमंत्री सहाय्यता निधीला 5 कोटी, तर उत्तर प्रदेश मुख्यमंत्री सहाय्यता निधीला 5 कोटी रुपयांचे योगदान त्याने दिलं आहे.

दरम्यान, गेल्या आठवड्यात अजयने ‘FWICE’ अर्थात फेडरेशन ऑफ वेस्टर्न सिने एम्प्लॉइज’ला 51 लाखांची मदत केली होती.

 

ट्रेंडिंग बातम्या-

कंगना रनौतच्या बहिणीची उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका; म्हणाली…

या शहरांमध्ये मास्क कंपलसरी; मास्क न लावता घराबाहेर पडाल तर कारवाई- गृहमंत्री

महत्वाच्या बातम्या-़

कोरोना विरोधातील लढाईसाठी काँग्रेसची टास्कफोर्स; ‘या’ 18 नेत्यांना जबाबदारी दिली

‘या’ राज्याच्या सरकारनं लॉकडाउन वाढवला; देशातील पहिलं राज्य

महाविकास आघाडीवरचं संकट टळलं; राज्यपालांच्या कोट्यातून उद्धव ठाकरे आमदार होणार

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More