बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

ठाकरे सरकारचा मोठा निर्णय; आता लसीचा एक डोस घेतलेल्यांनाही मिळणार…

मुंबई | नुकतंच सरकारने रेल्वे प्रवासावरील निर्बंध कमी केले आहेत. दसऱ्यापासून लसीचे 2 दोन डोस घेतलेल्यांना रेल्वे प्रवासाची मुभा देण्यात आली आहे. आता लवकरच एक डोस घेतलेल्यांनाही ही मुभा देण्यात येणार असल्याची माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.

दोन डोस घेतलेल्यांना रेल्वे प्रवासाची परवानगी देण्यात आली आहे. मात्र दिवाळीपर्यंत कोरोना रुग्णांची संख्या अशीच नियंत्रणात राहिली तर दिवाळीनंतर एक डोस घेतलेल्यांनाही रेल्वे प्रवासाची परवानगी देण्यात येऊ शकते. यासोबतच मॉल, लोकल याठिकाणीही एक डोस घेतलेल्यांना परवानगी मिळणार आहे.

सध्या लस न घेतलेल्या किंवा लसीचा एकच डोस घेतलेल्या नागरिकांना मॉलमध्ये जाण्यास परवानगी नाही. रेल्वे प्रवासासाठी तर दोन्ही डोस घेतलेल्यांनाही परवानगी देण्यात आली नव्हती. परंतु सध्या कोरोना नियंत्रणात आल्याने दसऱ्यापासून ती परवानगी मिळाली आहे.

सरकार निर्बंध अजून कमी करण्याच्या विचारात आहे. त्यामुळे दिवाळीनंतरची परिस्थिती पाहून टास्क फोर्ससोबत बैठक घेउन मुख्यमंत्री पुढचा निर्णय घेतील, अशी माहिती राजेश टोपे यांनी दिली आहे. त्यामुळे कदाचित दिवाळीनंतर नागरिकांना पुन्हा पूर्वीप्रमाणे सार्वजनिक ठिकाणी फिरता येणार आहे.

थोडक्यात बातम्या- 

“देशावर भाजप म्हणून जे संकट आलंय ते दूर करायचं आहे”

काळजाचा थरकाप उडवणारा अपघात; दुचाकी दुभाजकावर आदळल्याने दोघांचा मृत्यू

‘…तर शहरात पाय ठेवणार नाही’; अमोल कोल्हेंनी भाजपला दिलं चॅलेंज

राज्याच्या कोरोना आकडेवारीत चढ-उतार, वाचा आजची ताजी आकडेवारी

भाजपचं टेन्शन वाढलं! उत्तर प्रदेशात प्रियंका गांधी काँग्रेसचा चेहरा

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More