बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

सीताराम येचुरी यांच्या 34 वर्षीय मुलाचं कोरोनाने निधन

नवी दिल्ली | माकप नेते सीताराम येचुरी यांच्या मुलाचं कोरोनामुळे निधन झालं आहे. आशिष येचुरी यांच्यावर गुरुग्राममधील खासगी रुग्णालयात उपचार सुरु होते.  सीताराम येचुरी यांनी ट्विटरवरुन यासंदर्भात माहिती दिली आहे.

मी अत्यंत दुःखाने कळवू इच्छितो, की माझा मोठा मुलगा आशिष येचुरी याचे आज सकाळी कोरोनामुळे निधन झाले. आशिषवरील उपचारादरम्यान आमच्या मनात आशेचा किरण जागवणाऱ्या प्रत्येकाचे आम्ही आभार मानतो. डॉक्टर, नर्स, फ्रंटलाईन आरोग्य कर्मचारी, स्वच्छता कर्मचारी आणि आमच्या पाठीशी उभे राहिलेले असंख्य जण, असं ट्विट येचुरी यांनी केलं आहे.

कोरोना संसर्गानंतर दोन आठवड्यांपूर्वी आशिष येचुरींना होली फॅमिली रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर त्यांना गुरुग्राममधील मेदांता रुग्णालयात हलवण्यात आले होते. गुरुग्राममधील मेदांता रुग्णालयात गुरुवारी पहाटे सहा वाजता आशिष येचुरी यांनी अखेरचा श्वास घेतला.

34 वर्षीय आशिष येचुरी हे व्यवसायाने पत्रकार होते. राजधानी दिल्लीतील एका आघाडीच्या वर्तमानपत्रात ते सिनिअर कॉपी एडिटर म्हणून कार्यरत होते. मित्र परिवारात आणि कुटुंबीयांमध्ये आशिष यांच्या जाण्याने हळहळ व्यक्त केली जात आहे.

 

 

थोडक्यात बातम्या- 

“कोरोनाची दुसरी लाट थोपवायला आता डिसेंबर महिना उजाडेल”

‘महाराष्ट्रासाठी ऑक्सिजन आणायला गेलेल्या एक्स्प्रेसला…’; शिवसेना खासदाराचा धक्कादायक आरोप

दिवसाढवळ्या झालेल्या गँगवॉरने पुणे हादरलं; अंगावर काटा आणणारा व्हिडीओ आला समोर

‘भिक मागा, चोरी करा पण रुग्णांना ऑक्सिजन द्या’; दिल्ली उच्च न्यायालयाने मोदी सरकारला सुनावलं

‘महाराष्ट्राला 500 मेट्रिक टन ऑक्सिजन पुरवठा व्हावा’; राजेश टोपे यांची मोदींकडे मोठी मागणी

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More