बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

मोठी बातमी! लखीमपूर हिंसाचार प्रकरणी एसआयटीचा खळबळजनक खुलासा

नवी दिल्ली | देशातील शेतकऱ्यांनी (Farmer Protest) केलेलं सर्वात मोठं आंदोलन सध्या संपलं आहे. पण या आंदोलनाचे अवशेष अद्यापी आपल्या पाऊलखुणा मिटवू शकले नाहीत. या ऐतिहासिक आंदोलनात तब्बल 700 पेक्षा अधिक शेतकऱ्यांचा मृत्यू (Farmers Death) झाला. लखीमपूर (Lakhimpur) येथील आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांवर गाडी घातल्यानं शेतकरी मृत्यू पावले होते. या घटनेवर आता एसआयटीनं (SIT) एक महत्त्वाची माहिती दिली आहे.

उत्तर प्रदेशात लखीमपूर खेरी येथे आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांवर केंद्रीय गृहराज्य मंत्री अजय मिश्रा (MOS Home Ajay Mishra) यांच्या मुलानं गाडी घातली होती. उत्तर प्रदेश सरकारनं या घटनेची चौकशी करण्यासाठी एसआयटी नेमली होती. या समितीनं आपला अहवाल न्यायालयात दाखल केला आहे. आणि ही घटना पुर्णपणे पुर्वनियोजित होती, असा खळबळजनक खुलासा या अहवालात करण्यात आला आहे.

मिश्रा याच्या गाडीनं शेतकऱ्यांना अतिशय अमानुषपणे चिरडलं होतं. या घटनेत चार शेतकऱ्यांचा मृत्यू झाला होता. एका पत्रकाराचा सुद्धा गाडीच्या धडकेच मृत्यू झाला होता. यानंतर देशभरातून या घटनेबद्दल संताप व्यक्त करण्यात आला होता. ही घटना पुर्वनियोजित होती. शस्त्रास्त्र सुद्धा बाळगण्यात आले होते, असं एसआयटीनं आपल्या चौकशीत म्हटलं आहे.

दरम्यान, एसआयटीनं न्यायालयाकडं मिश्रा याच्यावर नियोजित हत्या, अवैध हत्यारं बाळगल्याचा गुन्हा दाखल करण्याची परवानगी मागितली आहे. परिणामी न्यायलयानं एसआयटीची मागणी मान्य केली तर मिश्रावर हत्येचा गुन्हा दाखल होणार आहे.

थोडक्यात बातम्या 

“प्रकरण बाहेर आलं तर फटाक्यांची माळ लागेल”, राज ठाकरेंचा नेमका रोख कुणाकडे?

“कोण कोणाला सडवतोय हे आता उद्धव ठाकरेंना कळलं असेल”

ठाकरे सरकार पडणार का?, राज ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं…

मनसेचा अजेंडा काय? राज ठाकरे म्हणतात, “सध्या आघाडीचे दिवस पण…”

भाजपच्या 12 आमदारांना मोठा झटका! सर्वोच्च न्यायालयाने दिला ‘हा’ निर्णय

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More