बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘सत्तेत मांडीला मांडी लावून बसता आणि इथे एकमेकांना…’; प्रविण दरेकरांचा शिवसेनेवर घणाघात

रायगड | नगरपचांयतीच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र राजकीय वातावरण तापलेलं आहे. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर (Pravin Darekar) हे देखील प्रचारासाठी रायगड येथे गेले होते.  पोलादपूर, तळा, पाली येथे दरेकरांच्या प्रचारसभा आयोजित करण्यात आल्या होत्या. यावेळी प्रचारसभेत बोलताना त्यांनी शिवसेनेवर निशाणा साधला आहे. शिवाय  त्यांनी खासदार सुनील तटकरे (MP Sunil Tatkare) यांना इशाराही दिला आहे.

तळा येथील सभेत बोलताना त्यांनी भाजपच्या हातात सत्ता द्या विकास करू, असं आश्वासन दिलं. याशिवाय त्यांनी यावेळी बोलताना शिवसेनेवर जोरदार हल्ला चढवला आहे. “शिवसेना नेत्याला न्याय दिला नाहीत तर सामान्य जनतेला काय द्याल? तुमचं पोट कधी भरणार? असे प्रश्न विचारत त्यांनी शिवसेनेवर निशाणा साधला.

“खासदार तुम्ही, तुम्हीच पालकमंत्री, सत्तेत मांडीला मांडी लावून बसता आणि इथे एकमेकांना शिव्या घालता. जनतेला काय मूर्ख समजता काय?” असा खोचक सवाल प्रविण दरेकरांनी यावेळी विचारला आहे. पुढे ” ज्यांनी राजकारणात मुजोरी केली त्यांना पाणी पाजल्याशिवाय तळ्यातील जनता स्वस्थ बसणार  नाही,” अशा इशाराही त्यांनी सुनिल तटकरे यांना दिला आहे.

दरम्यान, आज रायगड जिल्ह्यातील 6 नगरपंचायतीच्या प्रचाराचा शेवटचा दिवस आहे. यामुळे इतर नेत्यांसह प्रविण दरेकर देखील जोमाने प्रचार करत असल्याचं पाहायला मिळालं. यावेळी त्यांनी प्रचारसभेत शिवसेनेवर निशाणा साधला. शिवाय, तळ्यातील जनतेला स्वच्छ आणि शुद्ध पाणी देण्याचे काम मी करेन, असं आश्वासनही दरेकरांनी यावेळी दिलं आहे.

थोडक्यात बातम्या-

Omicronच्या भीतीनं परिक्षा ऑनलाईन होणार की ऑफलाईन?; उच्च शिक्षणमंत्र्यांनी दिली ‘ही’ महत्त्वाची माहिती

‘उद्या माझ्या घरी सरकारी पाहुणे येणार’; नवाब मलिकांचा खबळजनक दावा

चिंताजनक! Omicron संदर्भात एम्सनं दिला ‘हा’ महत्त्वाचा इशारा

“छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणारा पक्ष या देशात ठेवायचा की नाही…”

‘पालक म्हणून आम्ही आमच्या मुलीला…’; अनुष्का शर्माची पोस्ट व्हायरल

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More