बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

केरळात आसमानी संकट! मदतीसाठी लष्कर आणि हवाई दल दाखल

तिरूअनंतपुरम | पावसाळा सुरू झाली की केरळमध्ये मोठ्या प्रमाणात पुराचा धोका वाढतो. गेल्या 4 वर्षात केरळात अनेकदा पूरस्थिती निर्माण झाली होती. अशातच आता केरळच्या समुद्र किनाऱ्यापासून काही अंतरावर कमी दाबाचा पट्टा तयार झाल्यानं आता केरळला मुसळधार पावसाने झोडपलं आहे. तर येत्या तीन दिवसात केरळात ढगफुटी होण्याची शक्यता वर्तवण्यात आल्यानं आता नागरिकामध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे.

काही दिवसांपूर्वी केरळमध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाल्याचं दिसतंय. अनेक गावांचा संपर्क तुटला असून 12 जण बेपत्ता असल्याची देखील माहिती समोर आली आहे. अशातच 17 ऑक्टोबर रोजी अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तर केरळच्या 5 जिल्ह्यांना रेड अलर्ट देखील जारी करण्यात आला आहे.

थ्रिसूर, पथानमथिट्टा, एर्नाकुलम, कोट्टायम आणि इडुक्की या पाच जिल्ह्यांना रेड अलर्ट देण्यात आला आहे. तर 7 जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय. केरळात येणारं आरमानी संकट पाहता केरळ सरकारने केंद्र सरकारकडे लष्कर आणि हवाई दलाची मदत मागितली होती. त्यानंतर आता केरळमध्ये लष्कर आणि हवाई दल दाखल झालं आहे.

दरम्यान, काही महत्त्वाच्या ठिकाणी हॅलिकाॅप्टर देखील सज्ज ठेवण्यात आले आहेत. तर आवश्यक असेल तरच घरातून बाहेर पडावं, अशा सूचना देखील प्रशासनाने दिल्या आहेत.

थोडक्यात बातम्या-

‘…तर आता जम्मू काश्मीरमध्ये स्वस्थ बसून चालणार नाही’; मोहन भागवतांचं मोठं वक्तव्य

‘वर्क फाॅम होम’ करताय? तर ‘ही’ गोष्ट केलीच पाहिजे

“साहेब! जो बुंद से गयी वो हौद से नहीं आती”

मोठी बातमी! मनमोहन सिंग यांना डेंग्यूची लागण, प्रकृतीबाबत आली ‘ही’ माहिती समोर

“आम्ही छापा टाकून काटा काढत नाही, काटा काढून छापा टाकतो”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More