‘SHIVDE I AM SORRY’ नंतर पिंपरीत ‘स्मार्ट बायका कुठे जातात? पोस्टरबाजीने खळबळ

पुणे | ‘SHIVDE I AM SORRY’ अशा पोस्टरने काही दिवसांपूर्वी खळबळ माजवली होती आणि आता असंच एक पोस्टर अख्ख्या पिंपरी चिंचवडमध्ये लावण्यात आलं आहे. “स्मार्ट बायका कुठे जातात ” अशा आशयाची ही फ्लेक्सबाजी करण्यात आली आहे.

पिंपरी शहरातील आकुर्डी ते चिखली या मुख्य वर्दळीच्या रस्त्यांवर हे फ्लेक्स लावण्यात आले आहेत.  “स्मार्ट बायका कुठे जातात?  या जागेवर लक्ष ठेवा 15 आॅक्टोबर, असं या पोस्टरवर लिहण्यात आलं आहे.

मात्र, ऐन नवरात्रीत स्त्रियांवर अशी वाक्य लिहून नेमकी जाहिरातबाजी चालू आहे की अजून या पाठीमागे नेमकं काय आहे याबद्दल अद्याप माहिती मिळालेली नाही.

महत्त्वाच्या बातम्या-

-भाजपला सत्तेची मस्ती आली आहे, आता जनताच त्यांची मस्ती उतरवेल- सुप्रिया सुळे

-अजितदादा… आमच्याही पाठीवर हात ठेवून पहा!

-काँग्रेसला मोठा धक्का; जेष्ठ नेत्याच्या पत्नीचा भाजपमध्ये प्रवेश!

-मोदींच्या मंत्रिमंडळातील ‘या’ मंत्र्याची खुर्ची धोक्यात? पंतप्रधानांकडे सगळ्यांचं लक्ष

-नागराज मंजुळेंच्या ‘नाळ’चा टीझर प्रदर्शित