बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

पुणे जिल्ह्यात आतापर्यंत तब्बल एवढ्या नागरिकांना मिळाली कोरोना प्रतिबंधक लस

पुणे | महाराष्ट्रात कोरोना रुग्णसंख्या वाढत असतानाच लसीकरण मोहिमेवर मोठ्या प्रमाणात भर देण्यात आला. देशातील सर्वाधिक लसीकरण पूर्ण केलेलं राज्य म्हणून महाराष्ट्राच्या नावाने विक्रम नोंद झाला आहे. त्यातच पुणे जिल्ह्यात कोरोना प्रतिबंधक लस घेतलेल्या नागरिकांची यादी नुकतीच जाहीर झाली आहे.

पुणे जिल्ह्यात आतापर्यंत तब्बल 25 लाख 25 हजार नागरिकांनी कोरोना लसीचे डोस घेतले आहेत. पुणे जिल्ह्यातील एकूण 38 टक्के नागरिकांना लसीचा पहिला डोस मिळाला असून 11 टक्के नागरिकांनी दोन्ही कोरोना लसीचे डोस घेतले आहेत. पुणे जिल्ह्यात आतापर्यंत 60 वर्षांवरील 80 टक्के ज्येष्ठ नागरिकांनी कोरोनाची लस घेतली आहे.

पुणे शहरात 9.5 लाख नागरिकांचं लसीकरण पूर्ण झालं असून पिंपरी-चिंचवड महापालिका क्षेत्रामध्ये पावणेपाच लाख आणि पुणे ग्रामीण भागात तब्बल 11 लाख नागरिकांचं लसीकरण पूर्ण करण्यात आलं आहे. लसीच्या तुटवड्यामुळे 18 ते 44 वयोगटातील फक्त 50 हजार तरुणांनाच कोरोना लसीचे डोस जिल्हाभरात देण्यात आले आहेत.

दरम्यान, पुणे जिल्ह्यात लसीकरण मोहीम मोठ्या प्रमाणात राबविण्यात येत आहे. पण लसींअभावी काही ठिकाणी अनेक वेळा लसीकरण काही दिवसांसाठी थांबवण्यात आल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. पुणे शहरात लसींअभावी आज सर्व लसीकरण केंद्र बंद ठेवण्यात येणार असल्याची माहिती पुणे महापालिकेकडून स्पष्ट करण्यात आली आहे.

थोडक्यात बातम्या –

कोरोना नाही तर पुण्यात ‘या’आजाराचा धोका वाढला; पुण्यात आतापर्यंत 25 मृत्यु

आमदार रोहित पवारांचा ‘झिंगाट डान्स’, कोरोना रूग्णांसोबत धरला ठेका; पाहा व्हिडीओ

दिलासादायक! मुंबईची कोरोनामुक्तीकडे वाटचाल; सक्रिय रूग्णसंख्येसह नव्या बाधितांच्या संख्येत लक्षणीय घट

ॲलोपॅथी-आयुर्वेद वाद पुन्हा पेटला?; रामदेव बाबांनी IMAला खुलं पत्र लिहुन विचारले ‘हे’ प्रश्न

लॉकडाऊनमध्ये दुकान सुरू ठेवल्याने महिला जिल्हाधिकाऱ्यांची मुजोरी, पाहा व्हिडिओ

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More