सातारा | बळीराजाच्या न थांबणाऱ्या आत्महत्या, सध्याची राज्यामधील अराजकतेकडे जाणारी अस्थिर राजकीय परिस्थिती आणि बेराजगारीने त्रासलेल्या युवा वर्गाची व्दिधा मनस्थिती या आणि अश्या अनेक बाबींचा विचार करुन आम्ही आमचा दरवर्षी साजरा होत असलेला 24 फेब्रुवारी 2020 रोजीचा वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय घेतला असल्याचं माजी खासदार उदयनराजे भोसले यांनी म्हटलं आहे.
मी माझा या वर्षीचा वाढदिवस साजरा करणार नसून शुभेच्छादेखील स्वीकारणार नाही. मी त्या दिवशी साताऱ्याला माझ्या घरी मुक्कामी नसल्याचं उदयनराजे भोसले यांनी सांगितलं आहे.
आमचा वाढदिवस कोणीही कोणत्याही पद्धतीने साजरा करू नये. त्यापेक्षा गोर-गरिब जनतेच्या आवश्यक गरजांसाठी परस्पर मदत करावी, असंही उदयनराजेंनी आपल्या समर्थकांना सांगितलं आहे.
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात असताना उदयनराजेंनी लोकसभा निवडणूक जिंकल्यावर विजयाचा गुलाल उधळला नव्हता. त्यावेळी राज्यात दुष्काळजन्य परिस्थिती होती. म्हणून त्यांनी निर्णय घेतला होता.
आमचा वाढदिवस कोणीही कोणत्याही पध्दतीने साजरा करु नये, त्यापेक्षा गोर-गरिब जनतेच्या आवश्यक गरजांच्या पूर्ती करीता परस्पर मदत करावी अशी आमची आंतरिक तळमळ आम्ही व्यक्त करीत आहोत. बळीराजाच्या न थांबणा-या आत्महत्या, सध्याची राज्यामधील अराजकतेकडे जाणारी अस्थिर राजकीय परिस्थिती आणि pic.twitter.com/TkUKta24dX
— Chhatrapati Udayanraje Bhonsle (@Chh_Udayanraje) February 22, 2020
ट्रेंडिंग बातम्या-
उद्धव ठाकरे-मोदी भेटीनंतर ‘वर्षा’वर तातडीची बैठक… शरद पवार, उद्धव ठाकरे अजित पवार हजर
“एमआयएम आणि भाजप एकाच नाण्याच्या दोन बाजू”
महत्वाच्या बातम्या-
Comments are closed.