बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

…म्हणून इमरान हाश्मीने दिला आलिया भट्टसोबत काम करण्यास नकार!

मुंबई | अभिनेता इमरान हाश्मीला रोमँटिक चित्रपटांसाठी ओळखलं जातं. मात्र एका रोमँटिक चित्रपटामध्ये अभिनेत्री आलिया भट्टसोबत काम करण्यास इमरान हाश्मीने नकार दिला होता. आलियासोबतच्या चित्रपटाला नकार देण्याचा खुलासा स्वत: इमरानने केला आहे.

इमरान हाश्मीने आलियासोबत चित्रपटाला नकार दिल्यानंतर याबाबत बरीच चर्चा रंगली होती. इमरान महेश भट्ट यांचा भाचा आहे. म्हणजेच आलिया इमरानची बहिण लागते. त्यामुळे इमरानने आलियासोबत रोमँटिक चित्रपट करण्यास नकार होता.

इमरान हाश्मी लवकरच ‘चेहरे’ आणि ‘मुंबई सागा’ या दोन मोठ्या चित्रपटांमध्ये दिसणार आहे. त्याचबरोबर तो ‘टायगर 3’ या चित्रपटात व्हिलनच्या भूमिकेमध्ये दिसणार आहे. ‘टायगर 3’ चित्रपटाचे पहिले वेळापत्रक मार्च 2021 च्या तिसर्‍या आठवड्यात मुंबईत होईल.

‘टायगर 3’ चित्रपटाचे शूटिंग, शाहरुख खानच्या ‘पठाण’ चित्रपटाच्या शूटिंगनंतर सुरू होणार आहे असं सांगितलं जात आहे. ‘पठाण’ चित्रपटात सलमान खानची काही मिनिटांची भूमिका असल्याचं देखील बोलल्या जात आहे. इमरान हाश्मी मार्चमध्येच या चित्रपटात दिसण्याची शक्यता वर्तवली आहे. चित्रपटाचं दुसरं वेळापत्रक मिडल इस्टमध्ये असण्याची शक्यता आहे. तर तिसरं आणि शेवटचं वेळापत्रक पुन्हा मुंबईत होणार आहे.

थोडक्यात बातम्या

संजय राठोडांचं ठरलं; मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांची भेट घेतल्यानंतर…

…अन् बायकोने नवऱ्याला टेम्पोला बांधून एक किलोमीटर फरफटत नेलं; पाहा व्हिडिओ

“उद्धव ठाकरे कुणाच्या दबावाला बळी पडत नाही, वेड अँन्ड वॉच”

“मृत्यूनंतर माझ्या अस्थी बिअरमधून पबबाहेरील नाल्यात विसर्जित करा”

संजय राठोड प्रकरणी मुख्यमंत्री मोठा निर्णय घेणार?; संजय राऊतांच्या ‘त्या’ ट्विटमुळे चर्चांना उधाण

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More