नाशिक | दिंडोरीचे आमदार नरहरी झीरवाळ विधानसभेचे उपसभापती झाले. यावेळी स्वागत प्रस्तावात मंत्री जयंत पाटील यांनी खुसखुशीत भाषण केलं. यावेळी माजी झीरवाळ यांच्यामागे गिरीश महाजन, आशिष शेलार बसले होते. हा संदर्भ घेत संगतीचा परिणाम होतो. त्यामुळे फडणवीस साहेब या दोघांना जरा दुसरीकडे बसवा, असा चिमटा जयंत पाटील यांनी काढला. तेव्हा शेलार आणि महाजन दोघेही खळखळून हसले.
देवेंद्र फडणवीस अतिशय सभ्य, सुसंस्कृत व्यक्ती आहेत असं म्हणत मागच्या बाकावर गिरीश महाजन व आशिष शेलार बसले होते. याचा संदर्भ घेत वार नेहमी मागून होतो, असं म्हणत फडणवीस साहेब या दोघांना जरा दुसरीकडे बसवा, असं म्हटल्यावर सभागृहात सदस्य हास्याचे कारंजे उडाले. पाटील यांनी आपल्या भाषणात आठवणींना उजाळा दिला.
झीरवाळ हे आदिवासी समाजाचे प्रतिनिधीत्व करतात. या समाजाला आज विशेष आनंद झाला आहे. ते पारंपारीक वेषात त्यांच्या स्वागताला जमले आहेत. झीरवाळ यांनीही त्यात सहभागी होण्याची परवानगी मागितली आहे. आपण सर्वांनी त्यात सहभागी होऊ या, अशा आठवणी पाटलांनी सांगितल्या.
राज्यात फडणवीस यांनी शपथ घेतल्यावर झीरवाळांनी मला दोन तीन वेळा फोन केला, असं सांगत जयंत पाटील म्हणाले, यावेळी होटेल फार मोठे आहे. कुठे काय आहे हे कळतच नाही. कुठेही गेले की बाॅडीगार्ड मागेच असतात. गोंधळ होतो आहे. असं झीरवाळ सांगत होते. पण हे सांगताना जयंत पाटील यांनाही हसू आवरत नव्हते. सभागृहातून हे बाॅडीगार्ड कोणाचे, अशी विचारणा झाल्यावर ते मुनगंटीवारांचे होते असं मी म्हणणार नाही, असा आणखी चिमटा पाटलांनी काढला.
ट्रेंडिंग बातम्या-
“विधान परिषेदसाठी माझी तयारी…फक्त पाटलांच्या निर्णयाची वाट पाहतोय”
“हा निर्णय म्हणजे आमचे हातपाय तोडले आणि आता पळायला सांगताय”
महत्वाच्या बातम्या-
नवी मुंबई महापालिकेची निवडणूक पुढे ढकला- जितेंद्र आव्हाड
माजी खासदार हिंदुराव नाईक निंबाळकर काळाच्या पडद्याआड
महावीर जयंतीचा कार्यक्रम रद्द करून जैन समाज कोरोनाग्रस्तांच्या उपचारासाठी निधी देणार
Comments are closed.