बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

…म्हणून मोदी ‘त्या’ विद्यार्थ्याला म्हणाले, “तुम्हाला भविष्य समजते का?”

नवी दिल्ली | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बैठकीत नुकताच 12 वीच्या सीबीएससी परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर पंतप्रधान मोदींनी अचानकपणे मुलांच्या बैठकीत भाग घेतला आणि त्यांच्याशी चर्चा केली.

कोरोनाची परिस्थिती पाहता परीक्षा रद्द होईल अशी अपेक्षा सर्वांनाच होती, परंतू सर्वोच्च न्यायालयाने मागील वर्षी दिलेल्या निर्णयामुळे यंदा परीक्षा घेणार की नाही? असा प्रश्न विचारला जात होता. पंतप्रधान मोदींनी हाच मुद्दा विद्यार्थ्यांसमोर उपस्थित केला. त्यावेळी तमिळनाडूतील एक विद्यार्थी त्या बैठकीत उपस्थित होता.

तामिळनाडूचा विद्यार्थी चित्रकद म्हणाला, परीक्षा होणार नसल्याचं माहीत असल्यानं अभ्यास कमीच केला. त्याच्या या वाक्यावर मोदी म्हणाले, तुम्हाला भविष्य पाहता येते का?,या प्रश्नावर विद्यार्थी थोडा गोंधळला आणि नाही म्हणाला, मी अंदाज लावला असं त्याने मोदींना सांगितलं. मग तुम्हाला कुटुंबीयांची बोलणी खावी लागली असतील असं त्यावर मोदी म्हणाले.

दरम्यान, निर्णय होईपर्यंत गोंधळाची स्थिती होती. निर्णय झाल्यानंतर मी दुपारी 12 पर्यंत झोप काढली!, असं एका विद्यार्थ्यांने मोदींना सांगितलं. त्यावर मोदी हसले. तर या काळात जे शिकलात, ते स्मरणात ठेवा, असा सल्ला त्यांनी विद्यार्थ्यांना दिला आहे. स्वप्नपूर्तीचा ध्यास ठेवा. आई-वडिलांना अभिमान वाटेल, असं मोदी म्हणाले.

थोडक्यात बातम्या-

छत्रपती घराण्याचं काम लोकांना पेटवण्याचं नाही, तर न्याय देण्याचं- खासदार संभाजीराजे

“टॅापर्स नेहमीच अव्वल राहतात”; मोदींच्या प्रश्नाला विद्यार्थ्यांचं भन्नाट उत्तर

सरकारवर टीका केली म्हणून राजद्रोहाचा खटला भरता येणार नाही; विनोद दुआंवरील गुन्हा रद्दबातल

प्रियकराचं लग्न ठरलं, ढोल-ताशा घेऊन दारात आलेल्या प्रेयसीनं केला भलताच ड्रामा

75 वर्षीय सासऱ्याला कोरोनाची लागण, सुनेनं पाठीवर उचलून दवाखान्यात नेलं!

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More