बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

…म्हणून राधाकृष्ण विखे पाटलांनी मानले नरेंद्र मोदींचे आभार!

नवी दिल्ली | गेल्या काही दिवसांपासून भाजपचे नेते दिल्लीतील नेत्यांच्या भेटीगाठी घेताना दिसत आहेत. अशातच भाजप आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी कुटुंबासह देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सदीच्छा भेट घेतली आहे. या भेटीमध्ये विखे पाटलांनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आभार मानले आहेत.

देशात प्रथमच सहकार मंत्रालय स्थापन केल्याबद्दल राधाकृष्ण विखे पाटील यांनी पंतप्रधान मोदीजी यांचा सत्कार करून आभार मानले आहेत. सहकार क्षेत्राचा आणि विखे-पाटील घराण्याचा जवळचा संबंध आहेत. कारण राधाकृष्ण विखे-पाटलांचे आजोबा विठ्ठलराव विखे-पाटील यांनी महाराष्ट्रात सहकाराची स्थापना केली. आशिया खंडामध्ये पहिला सहकारी साखर कारखाना विठ्ठलराव विखे-पाटलांनी प्रवरानगर येथे स्थापन केला होता.

या भेटीवेळी सुजय विखे-पाटलांची कन्या अनिषा सुजय विखे-पाटील यांनी पंतप्रधानांशी दिलखुलासपणे संवाद साधला. तर यावेळी विखे-पाटलांनी जनसेवा फाऊंडेशनच्या माध्यमातून बचतगटातील महिलांनी फुलांपासून तयार केलेल्या अगरबत्ती उत्पादनाची माहिती या भेटीत आदरणीय पंतप्रधानांना दिली.

दरम्यान, नरेंद्र मोदींआधी पाटलांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची दिल्ली येथे भेट घेतली. अमित शहा यांची सहकार खात्याच्या मंत्रीपदी नियुक्ती झाल्याबद्दल त्यांचा सत्कारही केला.

थोडक्यात बातम्या-

मराठा आरक्षणाबाबत ठाकरे सरकारने घेतला ‘हा’ महत्वाचा निर्णय!

‘…त्या दिवशी पुन्हा कडक लॉकडाऊन करणार’; आरोग्यमंत्री राजेश टोपेंचं मोठं वक्तव्य

राज्यातील हॉटेल चालकांसाठी मोठी बातमी! रात्री 10 वाजेपर्यंत परवानगी, पाळावे लागणार ‘हे’ नियम

‘भाजपचं मराठा आरक्षणावरील प्रेम पुतण्या मावशीसारखं’; शिवसेनेचा भाजपला टोला

“ठाकरेंचं मला सांगू नका माझा मुलगा पालिकेच्या शाळेत शिकत आहे”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More