बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘…म्हणून राज कुंद्राला अटक केलं’; मुंबई पोलिसांनी सांगितलं कारण

मुंबई | बाॅलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा दाम्पत्यासमोरील अडचणी दिवसेंदिवस वाढतच चालल्या आहेत. अश्लील व्हिडीओ प्रकरणी राज कुंद्राला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडीत सुनावली आहे. 28 जुलै रोजी कोर्टाने राज कुंद्राची जामीन याचिका फेटाळली. अशातच आता गुरूवारी मुंबई पोलिसांनी उच्च न्यायालयाला याप्रकरणी महत्वाची माहिती दिली आहे.

अश्लील व्हिडीओ प्रकरणाच्या तपासामध्ये राज कुंद्रा सहकार्य करत नसल्यामुळे, त्याला अटक केल्याची माहिती मुंबई पोलिसांनी उच्च न्यायालयाला दिली आहे. राजनं पोलिसांनी आपल्याला अटक करण्यापूर्वी नोटीस बजावली नसल्याचा दावा न्यायालयात केला आहे. मात्र, पोलिसांनी हा दावा फेटाळला आहे.

पोलिसांनी हा दावा फेटाळत म्हटलं की, राज कुंद्राला आम्ही नोटीस बजावली होती, मात्र त्यांनं ही नोटीस स्विकारली नाही. म्हणजेच त्यानं पोलिसांच्या तपास कार्यात सहकार्य केलं नाही.

दरम्यान, राज कुंद्राची सध्या पोलीस चौकशी करत आहे. पण पोलिसांनी विचारलेल्या प्रश्नांना राज नीट उत्तरं देत नाही. आपण या प्रकरणातून सहजपणे बाहेर पडू अशी राजला खात्री असल्यानं तो पोलिसांना मदत करत नसल्याचं म्हटलं जात आहे. मात्र राज कुंद्राविरोधात आमच्याकडे ठोस पुरावे आहेत. त्यामुळे या प्रकरणातून त्याची सुटका होणं कठीण असल्याचं पोलिसांनी म्हटलं आहे.

थोडक्यात बातम्या –

पोस्टाची बंपर योजना, आज पैसे गुंतवा 5 वर्षात 7 लाख मिळवा!

“… तर त्यांचे हात-पाय तोडणार, हा महाराष्ट्र आहे…इथं राज ठाकरेंचं राज चालतं”

राज कुंद्राच्या अटकेनंतर शिल्पाच्या बहिणीची पोस्ट व्हायरल, म्हणाली…

…त्यासाठी युवकांना जगाच्या एक पाऊल पुढं रहावं लागेल- नरेंद्र मोदी

‘काम हवं असेल तर निर्मात्यांना खूश करावं लागेल’; शरीरसुखाची मागणी करणाऱ्यांना मनसेचा चोप

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More