Top News पुणे

…म्हणून रानगव्याचा मृत्यू झाला; वनविभागातील अधिकाऱ्यांचं स्पष्टीकरण

पुणे | काल पुण्यातील कोथरूड परिसरात रानगवा फिरत असल्याचं आढळून आलं होतं. तर या पकडलेल्या रानगव्याचा दुर्देवी मृत्यूही झाला. या रानगव्याच्या मृत्यूनंतर प्राणीप्रेमींकडून संताप व्यक्त करण्यात येतोय. दरम्यान रानगव्याचा मृत्यू कसा झाला याबाबत प्रश्न उपस्थित केले जातायत. यावर वनविभागातर्फे अधिकृत माहिती देण्यात आलीये.

पुण्यातील उपवनसंरक्षक राहुल पाटील यांनी सांगितलं की, “आपण प्राण्यांच्या जंगलात अतिक्रमण केल्याने तो माणसांच्या वस्तीत येणं स्वाभाविक आहे. रेस्क्यू झाल्यानंतर गव्याच्या शरीरातील उष्णता कमी झाली. शिवाय तो सतत धावूनही थकला होता.”

भूल देण्याच्या इन्जेक्शनचा ओव्हरडोस झाल्याच्या आरोपावर पाटील म्हणाले, “रानगव्याला 2 वेळा भूल देण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यावेळी घटनास्थळी प्राण्यांचे डॉक्टरही उपस्थित होते. त्यामुळे इन्जेक्शनचा ओव्हरडोस झाला नाही.”

तसंच त्याला पाहण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती. त्याऐवजी त्यांनी त्याला सहकार्य करायला हवं होतं, असंही पाटील म्हणाले.

थोडक्यात बातम्या-

‘आज शिर्डीतील ड्रेसकोड सक्तीचा बोर्ड काढणारच’ तृप्ती देसाईंचा निर्धार

आधीच स्क्रिनवर 15 सेकंदाचा रिप्ले दाखवणं महागात पडलं; ‘त्या’ निर्णयावर कोहली नाराज

कोरोना लसीबाबतची ‘ती’ बातमी खोटी; आरोग्य मंत्रालयाने केलं स्पष्ट

“…तर भाजपला राज्यात 50 पेक्षा जास्त जिंकता लढवता येणार नाही”

मराठा आरक्षणावरील स्थगिती हटविण्यास सुप्रिम कोर्टचा नकार, ‘या’ तारखेला होणार पुढील सुनावणी

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या