बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

….म्हणून शिक्षक उमेदवारांनी मुख्यमंत्र्यांना रक्तानं लिहिलं पत्र

नवी दिल्ली | उत्तर प्रदेशमध्ये योगी सरकारनं शैक्षणिक विभागाचे प्रश्न सोडवण्यासाठी उच्चस्तरीय समिती स्थापन केली आहे. यामध्ये विद्यालयातील रिक्त असलेल्या शिक्षकांच्या जागेंवर निर्णय घेण्यात येणार आहे. शिक्षक उमेदवारीसाठी पदे रिक्त असतानाही ही पदे भरली जात नसल्यानं उमेदवार चार महिन्यांपासून आंदोलन करत आहेत. याच पार्श्वभूमीवर आता शिक्षकांनी मुख्यमंत्री योगी आदीत्यनाथ यांना चक्क रक्तानं लिहिलेलं पत्र पाठवलं आहे.

शिक्षक भरतीच्या 1 लाख 37 हजार 500 जागा रिक्त असतानाही त्या भरल्या जात नसल्यानं या शिक्षकांनी थेट योगींना रक्तानं लिहिलेलं पत्र पाठवलं आहे. सोमवारी 69 हजार शिक्षक भरतीच्या लेखी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांनी हे पत्र मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना लिहिलं आहे.

उमेदवारांनी रक्तानं लिहिलेल्या या पत्रात म्हटलं की, चार महिन्यांपासून उपोषणाला बसलेले उमेदवार तहानलेच्या आणि भूकेच्या अवस्थेत आहेत. आमची चूक माफ करुन 1 लाख 37 हजार 500 रिक्त जागांवर पात्र असलेल्या उमेदवारांना नियुक्त करावे.

दरम्यान, रिक्त असलेल्या शिक्षकांच्या जागेकडे दुर्लक्ष का केले जात आहे, असा प्रश्नही या पत्रातून योगी सरकारला विचारण्यात आला आहे. या मागण्यांना न्याय द्या, नाहीतर आमरण उपोषण करु असंही पत्रात म्हटलं आहे. उमेदवारांनी हे पत्र मेल आणि फॅक्सद्वारे मुख्यमंत्र्याना पाठवलं आहे. त्यामुळे आता योगी सरकार यावर काय निर्णय घेईल हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

थोडक्यात बातम्या – 

‘मला समन्स बजावला नाही’, ‘त्या’ चर्चांवर समीर वानखेडेंचं स्पष्टीकरण

ऐन दिवाळीच्या तोंडावर राज्य सरकारने दिली एसटी कर्मचाऱ्यांना भेट; केली ‘ही’ मोठी घोषणा

“समीर वानखेडे कायद्यापेक्षा मोठे नाहीत, त्यांना तर…”

आगामी महापालिका निवडणुकीतील युतीबाबत जयंत पाटलांचं मोठं वक्तव्य!

“शमी त्यांना माफ कर, आम्ही तुझ्यासोबत आहोत”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More