बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

….म्हणून पंचांनी हटवली रिषभ पंतच्या ग्लोव्हजवरची पट्टी; पाहा व्हिडीओ

मुंबई | भारत आणि इंग्लंड यांच्यात खेळण्यात येणाऱ्या तिसऱ्या कसोटी सामन्यात सामन्यात इंग्लंडने आघाडी घेतली आहे. सामन्याच्या पहिल्याच दिवशी भारताचा डाव पत्यासारखा कोसळला. फक्त 78 धावांवर भारतीय संघ गारद झाला. त्यानंतर आता इंग्लंडने पहिल्या डावाअखेर 354 धावांची आघाडी घेतली आहे. त्यानंतर आता तिसऱ्या दिवशी मैदानात नवा वाद निर्माण झाला आहे.

तिसऱ्या दिवसाच्या दुसऱ्या सत्रात भारताचा यष्टीरक्षक रिषभ पंतने डेव्हिड मलानचा झेल पकडला. त्यावर भारतीय खेळाडू्ंनी अपिल केली. त्यावर अंपायरने नाॅट आऊट निर्णय दिला. त्यानंतर कर्णधार विराट कोहलीने गोलंदाज आणि यष्टीरक्षक यांच्याशी सल्लामसलद केला आणि भारताने रिव्हीव घेतला. रिव्हीह घेतल्यानंतर भारताला विकेट मिळाली. त्यानंतर दोन्ही अंपायरांनी रिषभ पंतच्या जवळ जाऊन संवाद साधला.

मैदानात असलेले पंच एॅलेक्स वार्फ आणि रिचर्ड केटलबरो यांनी पंतला किपिंग ग्लोव्हजवरील टेप काढण्यास सांगितलं. रिषभने करंगळी आणि शेजारील अनामिकेला टेप लावली होती. हे नियमबाह्य असल्यानं अंपायरने त्यावर आक्षेप घेतला. त्यानंतर अंपायरने कर्णधार विराट कोहलीला देखील नियम सांगितला. त्यानंतर रिषभने अखेर ती टेप काढून टाकली.

दरम्यान, यष्टीरक्षक करणाऱ्या खेळाडूने अंगठा आणि तर्जणीच्या मधल्या भागा व्यतिरिक्त कुठेही वगळता इतर बोटांमध्ये कोणत्याही प्रकारची पट्टी असू नये, असा नियम आहे. एमसीसी किपिंग ग्लोव्हज कायदा 27.2 नुसार हा नियम आहे. त्यामुळे अंपायरने पंतच्या ग्लोव्हजवरील टेपवर आक्षेप घेतला होता.

पाहा व्हिडीओ-

थोडक्यात बातम्या-

उद्यापासून 4 दिवस बँका बंद; जाणून घ्या कारण!

“जनता कुंभकर्णासारखी झोपली आहे, मी एकटा काय करू?”

अबब! थेट कारवरच उतरलं विमान… बघा नेमका काय घडला प्रकार

“आम्ही अस्वल… आमच्यावर खूप केस आहेत, दहीहंडी करणारच”

“मुख्यमंत्री आणि संजय राऊतांनी शरद पवारांची शिकवणी लावावी”

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More