Top News देश

…म्हणून ‘आज तक’ला एक लाखांचा दंड; ‘या’ 3 चॅनल्सना माफी मागण्याचे आदेश

नवी दिल्ली | अभिनेता सुशांतसिंह राजपूत प्रकरणात बनावट ट्विट प्रसारित केल्याबद्दल नॅशनल ब्रॉडकास्टिंग स्टॅण्डर्ड्स अथॉरिटी (एनबीएसए) या संस्थेने ‘आज तक’ या वृत्तवाहिनीला 1 लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. आजतकसह तीन वाहिन्यांना माफी मागण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

सुशांतसिंग प्रकरणात वृतांकन मार्गदर्शक तत्वांचे उल्लंघन केल्याबद्दल ही कारवाई करण्यात आली आहे.  आज तकला माफी मागण्याचे तर झी न्यूज, इंडिया टीव्ही, न्यूज 24 या तीन वृत्तवाहिन्यांनी जाहिर माफी मागण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

एनबीएसएचे अध्यक्ष व सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायामूर्ती ए. के. सिक्री यांनी यासंदर्भात आदेश दिला आहे. सौरव दास यांनी याप्रकरणी तक्रार केली होती. एनबीएसएच्या सर्व आदेशाची माहितीही सौरव यांनी आपल्या ट्विटर खात्यावरुन दिली आहे.

महत्वाच्या बातम्या-

कंगणा राणावत पुन्हा अडचणीत, ‘या’ कारणामुळे कोर्टानं दिला गुन्हा दाखल करण्याचा आदेश

“केंद्र सरकारने आणलेले काळे कायदे शेतकरी आणि कामगारांवर अन्याय करणारे”

“राजे सम्राट अशोक, छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती शाहू महाराज या तिघांनाच आम्ही राजे मानतो”

धक्कादायक! भर बाजारात अशी केली आत्महत्या, ऐकणाऱ्याच्या अंगावर येईल काटा!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या