बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

…तर आपण कोरोनाची लढाई जिंकू शकतो- निती आयोग

नवी दिल्ली | कोरोनाची दुसरी लाट ओसरत असली तरी तिसऱ्या संभाव्य लाटेचा धोका तज्ज्ञांकडून वर्तवला जात आहे. कोरोनाचा धोका लक्षात घेता लसीकरणावर भर दिला जात आहे. त्याचबरोबर कोरोना नियमांचं पालनही करण्याचं आवाहन केलं जात आहे. अशातच आता निती आयोगाकडून कोरोनाची लढाई कशी जिंकता येईल याविषयी सांगितलं आहे.

कोरोना महामारीची लढाई आपण जिंकू शकतो. त्यासाठी आपल्याला सण-उत्सवाच्या काळात होणारी विनाकारण गर्दी टाळावी लागणार आहे, असं निती आयोगाचे सदस्य तसंच लसीकरणासाठी नेमण्यात आलेल्या टास्क फोर्सचे प्रमुख डॉ. व्ही. के पॉल यांनी सांगितलं आहे.

पुढे त्यांनी सांगितलं आहे की, अनावश्यक ठिकाणची गर्दी टाळावी. कोरोना आटोक्यात आणण्यासाठी दिलेले निर्बंध काटेकोरपणे पाळावे. लसीकरण घेण्यास नागरिकांनी पुढे यावं, असं केल्यास आपण कोरोना आटोक्यात आणू शकतो.

दरम्य़ान, कोरोनाच्या तिसऱ्या लाटेबाबत केंद्र सरकारला सावध करत इशारा दिला आहे. पुढच्या महिन्यात सप्टेंबरमध्ये रोज कोरोनाच्या नवीन रुग्णांची संख्या 4 ते 5 लाखांपर्यंत आढळून येऊ शकते. त्यामुळे नागरिकांना सतर्क राहण्याची गरज आहे.

थोडक्यात बातम्या – 

‘लस घेतली तर ब्रेकअप करेल’, गर्लफेंडला बाॅयफ्रेंडची अजब धमकी

“महाविकास आघाडीने मित्रपक्षांचा विचार न केल्यास आम्ही…”

मोदीजींच्या वाढदिवशी #राष्ट्रीय_बेरोजगार_दिवस ट्रेडिंगमध्ये

‘पुढचे 3 महिने अत्यंत महत्वाचे’; केंद्र सरकारने नागरिकांना केलं हे महत्त्वाचं आवाहन

“मराठवाडा वाॅटर ग्रीडची अवस्था राजाच्या मेलेल्या पोपटासारखी”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More