बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

…तर मग कर्णधारची गरजच काय?; KKRच्या ‘त्या’ कृतीवर गौतम गंभीर भडकला

मुंबई | कोलकाता नाईट रायजर्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात रविवारी सामना खेळवला गेला. हा सामना अखेरच्या चेंडूपर्यंत रंगला होता. या सामन्यात चेन्नईने कोलकातावर 2 गडी राखून विजय मिळवला होता. मात्र या सामन्यावेळी केकेआरच्या डगआऊटमधून केलेल्या एका इशाऱ्यामुळे भारताचा माजी खेळाडू आणि आयपीएलचा समालोचक गौतम गंभीर चांगलाच संतापल्याचं पहायला मिळालं.

कोलकाता नाईट रायजर्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्या सामन्यात कोलकाताचा सामना जिंकण्याची चांगली संधी होती. सामना निर्णायक टप्प्यावर असताना कोलकाताचा कर्णधार इयाॅन माॅर्गनने 19 षटक टाकण्याची जबाबदारी प्रसिद्ध कृष्णावर सोपवली आणि या षटकात पारडं चेन्नईकडं वळालं. त्यावेळी केकेआरच्या डगआऊटमधून काही संकेत देण्यात आले.

केकेआरच्या डगआऊटमधून मोठ्या अंकात 3 आकडा लिहिलेला क्रमांक लावण्यात आला होता. कोणत्या गोलंदाजाला ओव्हर द्यावी, अशा प्रकारचा तो संकेत देण्यात आला होता. हा संकेत पाहून समालोचन करत असलेला गौतम गंभीर चांगलाच भडकला. जर अशाच खाणाखूणा करायच्या असतील तर मैदानात कर्णधारची काय गरज? असं गंभीर म्हणाला आहे.

दरम्यान, जर मी या परिस्थितीत कर्णधार असतो, तर मी कर्णधारपद सोडून दिलं असतं. सामना जिंकण्यासाठी हा पर्याय योग्य नाही, असंही गौतम गंभीर यावेळी म्हणाला आहे.

थोडक्यात बातम्या-

“शेतकऱ्यांना थोडा फायदा मिळू लागला की भाजपच्या पोटात दुखतं”

शाळा उघडताच कोरोनाचा शिरकाव; 32 विद्यार्थीं कोरोना पाॅझिटिव्ह सापडल्यानं खळबळ

राज्याच्या कोरोना रूग्णांच्या आकडेवारीमध्ये चढ-उतार, जाणून घ्या आजची आकडेवारी!

प्लेऑफचं गणित बिघडलं! हैदराबादचा राजस्थानवर 7 गडी राखून विजय

मुंबईच्या कोरोना आकडेवारीत कमी अधिक प्रमाणात वाढ, वाचा आजची आकडेवारी

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More