सोशल मीडियाला जातीय रंग, डीपी बदला मोहीम तीव्र!

मुंबई | कोरेगाव भीमा प्रकरण शांत होत नाही तोच सोशल मीडियावर या प्रकरणाचे पडसाद दिसायला सुरुवात झालीय. व्हॉट्सअॅप आणि फेसबुकवर अनेक ग्रुप्स तसेच प्रोफाईल भगव्या आणि निळ्या झेंड्यांचे दिसू लागले आहेत. 

हिंसाचारानंतर वेगवेगळ्या प्रकारचे चिथावणीखोर मेसेज सोशल मीडियातून फिरवले जात आहेत. ज्यामध्ये भगव्या रंगाचे डीपी ठेवण्याचं तसेच निळ्या रंगाचे डीपी ठेवण्याचं आवाहान करणाऱ्या मेसेजेसचा समावेश आहे. 

व्हॉट्सअपसोबत फेसबुकवरही ही डीपी बदला मोहीम तीव्र करण्यात आलीय. त्यामुळे जातीय द्वेष भडकवण्यास आणखी पाठबळ मिळताना दिसतंय. 

शांततेचं आवाहन करणारा एक मेसेज