मुंबई | सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका व्हीडिओमुळे रातोरात स्टार झालेल्या रानू मंडल आता प्लेबॅक सिंगर झाल्या आहेत. काही दिवसांपूर्वी त्याचं ‘तेरी मेरी कहानी’ हे गाणं रिलीज झालं असून याशिवाय त्यांनी प्रसिद्ध प्लेबॅक सिंगर हिमेश रेशमियासोत 3 गाणी गायली आहेत.
सध्या सोशल मीडियावर रानू मंडल यांच्या नावाचीच चलती आहे. स्टेशनवर गाणं गाऊन भीक मागणाऱ्या रानू मंडल यांचा बॉलिवूड प्लेबॅक सिंगर होण्यापर्यंतचा प्रवास खरंच थक्क करणारा असाच होता. त्याचे अनेक व्हीडिओ सुद्धा व्हायरल झाले. पण आता एक नवा व्हीडिओ सोशल मीडियावर चर्चेत आला आहे. या व्हीडिओमध्ये त्या बंगली भाषेतील दुर्गापूजेचं गाणं गाताना दिसत आहे.
कोलकातामधील दुर्गा पूजेच्या निमित्तानं रानू यांनी एक बंगाली गाणं रेकॉर्ड केलं. त्याच्या या गाण्याचा व्हीडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
रानू यांचं हे गाणं त्यांनी बॉलिवूडमध्ये एंट्री करण्याअगोदर रेकॉर्ड केलं होतं असं बोललं जातं. त्यानंतर त्यांनी मुंबईतून परतल्यानंतर त्यांनी या गाण्याला फायनल टच दिला आहे. हे बंगाली दुर्गा पूजा थीमचं गाणं प्रीतम डे यांनी लिहिलं आहे.
महत्वाच्या बातम्या-
साताऱ्यात दोन्ही राजे शक्तिप्रदर्शन करत आज उमेदवारी अर्ज दाखल करणार- https://t.co/fuMDEl8UgA #म
— थोडक्यात (@thodkyaat) October 1, 2019
“तुम्हाला मुख्यमंत्रिपदावर राहण्याचा नैतिक अधिकार राहिलेला नाही; तात्काळ राजीनामा द्या”- https://t.co/woy3wOHfb5 @NCPspeaks @nawabmalikncp @Dev_Fadnavis
— थोडक्यात (@thodkyaat) October 1, 2019
पुतण्यानंतर ‘हा’ कट्टर समर्थकही जयदत्त क्षीरसागरांच्या विरोधात निवडणुकीच्या रिंगणात! – https://t.co/tPsLnvHeU9 @NCPspeaks @ShivSena
— थोडक्यात (@thodkyaat) October 1, 2019
Comments are closed.