Loading...

भिडे आणि एकबोटेंना अटक करा; सोशल मीडियावर जोरदार मागणी सुरु

मुंबई | श्रीशिवप्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष संभाजी भिडे आणि हिंदू एकता आघाडीचे मिलिंद एकबोटे यांच्या अटकेची जोरदार मागणी सध्या सोशल माध्यमांमध्ये सुरु झाली आहे. सोशल मीडियावर यासंदर्भात #ArrestBhideEkbote हा हॅशटॅग ट्रेंड करण्यात येतोय. आश्चर्याची गोष्ट म्हणजे हा हॅशटॅग टॉप ट्रेंड होत आहे.

कोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरणात संभाजी भिडे आणि मिलिंद एकबोटे यांचा सहभाग असल्याचा आरोप करण्यात येत आहे. यासंदर्भात मिलिंद एकबोटे यांना अटक देखील झाली होती.

Loading...

दरम्यान, राज्यात शिवसेना-काँग्रेस आणि राष्ट्रवादीचं नवं सरकार विराजमान झालं आहे. त्यामुळे नवीन सरकारने भिडे आणि एकबोटेंवर कारवाई करावी, अशी मागणी सध्या जोर धरत आहे.

कोरेगाव भीमा येथे १ जानेवारी २०१८ रोजी मोठा हिंसाचार उसळला होता. या ट्रेंडच्या निमित्ताने हा विषय पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आला आहे.्ट

 

Loading...

 

Loading...

 

 

 

 

 

 

महत्त्वाच्या बातम्या-

 

 

 

Loading...