बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“विधानसभेच्या काही सदस्यांनी मला आई-बहिणीवरुन शिव्या दिल्या”- भास्कर जाधव

मुंबई | आज विधानसभेचं अधिवेशन पार पडत आहे. अधिवेशनादरम्यान विविध मुद्यांवरुन विरोधक आणि महाविकास आघाडी सरकारमध्ये खडाजंगी पाहायला मिळत आहे. दोन्हा बाजूचे नेते एकमेकांवर सतत बरसताना दिसत आहेत. अशातच आता तालिका अध्यक्ष भास्कर जाधव यांनी आजच्या या अधिवेशनाविषयी बोलताना विरोधकांवर गंंभीर आरोप केला आहे.

सभागृहात आज जे घडलं ते लांछनास्पद आणि महाराष्ट्राच्या परंपरेला काळिमा फासणारं आहे. विधानसभेतील काही सदस्यांनी मला आई बहिणीवरुन शिव्या दिल्या आहेत, असा गंभीर आरोप भास्कर जाधव यांनी केला आहे. जाधव यांनी केलेल्या या आरोपानंतर आता विरोधक काय बोलणार, हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

दरम्यान, अधिवेशनादरम्यान विरोधकांनी सुरुवातीपासूनच आक्रमक पवित्रा घेतल्याचं पहायला मिळालं. ओबीसीच्या मुद्यावरुन सत्ताधारी-विरोधक आमनेसामने आले. ओबीसी आरक्षणाच्या मुद्यावरून राष्ट्रवादीचे आमदार आणि मंत्री छगन भुजबळ यांनी ओबीसी समाजाच्या आरक्षणासाठी केंद्र सरकार इम्पेरीकल डाटा उपलब्ध व्हावा तसा ठराव मांडला. पण ठराव मांडू न दिल्यामुळे भाजपच्या आमदारांनी जोरदार गोंधळ घातला.

विरोधकांनी सभागृहात सरकारविरोधात घोषणाबाजी देखील केली. तसेच विधानसभा अध्यक्षांच्या दालनात सत्ताधारी विरोधकांमध्ये धक्काबुक्की झाल्याची माहिती आहे. यानंतर सभागृहाचं कामकाज 10 मिनिटांसाठी तहकूब करण्यात आलं होतं.

थोडक्यात बातम्या –

अधिवेशनात गोंधळ घालणार्‍या भाजपच्या 12 आमदारांवर एक वर्षांसाठी झाली ‘ही’ कारवाई

पावसासाठी आता ‘या’ तारखेपर्यंत पाहावी लागणार वाट; शेतकऱ्यांसमोर दुबार पेरणीचं संकट

सरकारला धारेवर धरल्याशिवाय आम्ही राहणार नाही- प्रविण दरेकर

कोणतीही धक्काबुक्की झालेली नाही, आम्ही त्यांना पुरुन उरलो- देवेंद्र फडणवीस

वारीला बंदी हे द्रौपदीच्या पदराला हात घालण्याचं पाप- संभाजी भिडे

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More