काही महिला ब्रेकअप झालं की बलात्काराची तक्रार करतात!

नवी दिल्ली | काही महिला प्रेमसंबंध प्रस्थापित झाल्यावर परस्पर संमतीने शरीरसंबंध ठेवतात मात्र ब्रेकअप झाल्यावर मात्र बलात्काराची तक्रार दाखल करतात, असं निरीक्षण दिल्ली उच्च न्यायालयानं नोंदवलं आहे.

एका महिलेनं पतीविरोधात घरगुती हिंसाचाराची तक्रार नोंदवली होती, तसेच लग्नापूर्वी पतीने आपल्यावर बलात्काराचा आरोप ठेवला होता. याप्रकरणी कनिष्ठ न्यायालयाने पतीची बलात्काराच्या खटल्यातून निर्दोष मुक्तता केली होती. हा निर्णय उच्च न्यायालयाने कायम ठेवला.

यावेळी कायद्याचा अस्त्र म्हणून वापर केला जात असल्याचं निरीक्षण न्यायालयानं नोंदवलं.

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

तुमच्या पसंतीच्या बातम्या