बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘कुणी चुकीच्या पद्धतीनं स्पर्श करायचं तर कुणी कमरेवर हात ठेवायचं’; भारतीचा धक्कादायक खुलासा!

मुंबई | कॉमेडीयन भारती सिंहने आज टीव्ही इंडस्ट्रीमध्ये आपलं एक वेगळं स्थान निर्माण केलं आहे. भारती सिंह क्षणात समोरच्याला हसवू शकते. मात्र, प्रेक्षकांना खळखळून हसवणाऱ्या भारतीने आपल्या वैयक्तिक आयुष्याबद्दल असे काही खुलासे केले आहेत जे ऐकून सर्वचजण हैराण झाले आहेत. मनिष पॉलच्या एका पॉडकास्ट चॅट शोमध्ये भारती सिंहने आपल्या आयुष्यातील काही किस्से शेअर केले आहेत.

यावेळी भारती सिंह म्हणाली की, करिअरच्या सुरुवातीला माझी आई माझ्याबरोबर यायची. माझे वडील बाहेर असायचे मात्र माझी आई नेहमी माझ्याबरोबर असायची. माझ्या आईला त्यावेळी काही लोक बोलायचे अंटी तुम्ही घाबरु नका, आम्ही तुमची काळजी घेऊ. तेव्हा मला मॉडर्न गोष्टींबद्दल खूप कमी माहिती होती.

तसेच ज्यावेळी मी कामासाठी सेटवर जायचे त्यावेळी कुणी चुकीच्या पद्धतीने स्पर्श करायचं तर कुणी कमरेवर हात ठेवायचं. मला त्यावेळी हे देखील समजत नव्हतं की हा मुलींसाठी चुकीचा स्पर्श आहे. जे समन्वयक आम्हाला पैसे द्यायचे तेच कमरेवर हात घासायचे, असा धक्कादायक खुलासा भारतीने यावेळी केला आहे.

इंडस्ट्रीतील या भयाण वास्तवाबद्दल सांगताना भारती पुढे म्हणाली की, मला माहित होतं की ही चांगली भावना नाही. पण हे लोक माझ्या चुलत्यांच्या वयांचे होते. त्यामुळे मला वाटायचं की या लोकांच्या मनात असं काही नाही मीच चुकीची आहे. परंतु आता मला वाटतं की मी खरंच त्यावेळी मूर्ख होते, कारण या गोष्टी मी त्यावेळी समजू शकले नाही.

थोडक्यात बातम्या – 

‘शरद पवार गुगली टाकण्यात एक्सपर्ट’; काँग्रेसच्या या बड्या नेत्याचं सूचक वक्तव्य

एकीकडे आषाढी यात्रेवर निर्बंध अन् दुसरीकडे पंढरपुरात जयंत पाटलांच्या बैठकीत कोरोना नियमांचं उल्लंघन

“भाजप ही वॉशिंग मशीनसारखी झाली असून इथे डाकू पण साधू होवू शकतो”

दिलासादायक! मुंबई कोरोनामुक्तीच्या वाटेवर; आजची रुग्णसंख्या आली 500 च्या खाली

पुणे कोरोना अपडेट! जाणून घ्या आजची आकडेवारी एका क्लिकवर

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More