बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

काॅफीसाठी उशीर झाला म्हणून महिलेनं केलं असं काही की….

नवी दिल्ली | सोशल मीडिया माध्यम हे असं माध्यम आहे जिथे कधी काय व्हायरल होईल काही सांगता येत नाही. लोक एका रात्रीत प्रसिद्ध होतात. अशातच सध्या एक व्हिडीओ सोशल मीडियावर गराळा घालताना दिसत आहे. व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये एका महिलेने एका काॅफीसाठी मॅकडोनल्समध्ये गोंधळ घातलेला पहायला मिळाला.

सध्या व्हायरल होणारा व्हिडीओ अमेरिकेच्या आर्कान्सा येथील मॅकडोनल्सच्या आउटलेटमध्ये घडला आहे. एका महिलेनं काॅफीसाठी ऑर्डर दिली होती. मात्र बराच वेळ झाला तरी कॉफी येत नसल्यामुळं तिनं एक दोनदा विचारणा केली. तिथल्या स्टाफनं आणखी पाच मिनिटे लागतील असं सांगितलं. हे ऐकून या महिलेला राग आला. रागाच्या भरात तिनं टेबलवरील सर्व साहित्य फेकून दिलं.

महिलेला राग इतका अनावर झाला की तिला आवरण्यासाठी पोलिसांना बोलवावं लागलं. पोलिसांनी पकडल्यावर महिलेनं सांगितलं की, तिला मधुमेहाचा त्रास आहे आणि तिला मधुमेहाच्या त्रासामुळे रहावलं नाही म्हणून तिनं गोंधळ घातला.

दरम्यान, हा व्हिडीओ तुफान व्हायरल होत असून अनेकांनी यावर मजेशीर प्रतिक्रिया दिल्या आहेत. अनेकांनी यावर लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव केला आहे.

थोडक्यात बातम्या – 

“प्रियांका गांधींमध्ये माजी पंतप्रधान दिवंगत इंदिरा गांधी यांचीच झलक दिसते”

सुखद धक्का! मुलाच्या चुकीमुळे बाप झाला करोडपती

‘राहुलजी तो दिवस लवकर उजाडो’; संजय राऊतांनी घेतली राहुल गांधींची भेट

‘नेकी कर दरिया में डाल’ हा देवेंद्र फडणवीस यांचा चांगला गुण- अमृता फडणवीस

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेविषयी आरोग्य मंत्र्यांचं मोठं वक्तव्य, म्हणाले…

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More