बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“मी सांगितलं, राजीनामा देतोय, सोनिया म्हणाल्या, I AM SORRY अमरिंदर”

चंदीगड | यंदाचं वर्ष देशातील मुख्यमंत्री असणाऱ्या नेत्यांसाठी राजीनामा वर्ष ठरत आहे. प्रत्येक पक्ष आपापल्या सत्ताधारी मुख्यमंत्र्यांचा राजीनामा घेत आहे. या महिन्यात तर दोन मुख्यमंत्र्यांना खुर्ची सोडावी लागली आहे. काल पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदरसिंग यांनी राजीनामा दिला आहे.

अमरिंदर सिंग यांनी 2017 साली मुख्यमंत्री पदाची खुर्ची हातात घेतली होती. पण त्यांच्या राजकारणाला उतरती कळा तर नवज्याोतसिंह सिद्धू यांच्या काॅंग्रेस प्रवेशापासूनच लागली आहे. काल राजीनामा दिल्यावर अमरिंदर सिंग यांच्या बोलण्यातून सिद्धू यांच्याबद्दलचा राग दिसून येत होता. राजीनामा दिल्यावर अमरिंदरसिंग म्हणाले की, मी सोनिया गांधी यांना फोनवर राजीनामा देत असल्याचं सांगितलं, त्यावर सोनिया गांधी आय एम साॅरी अमरिंदर असं म्हणाल्या आहेत.

अमरिंदर सिंग यांनी पंजाब काॅंग्रेसला सत्तेत आणण्यात मोठी भूमिका बजावली होती. 2017 ला विधानसभा निवडणुकीत काॅंग्रेसने 77 जागांवर विजय मिळवून स्पष्ट बहूमतानं सत्ता स्थापन केली होती. या अगोदर 2002 साली कॅप्टन पहिल्यांदा मुख्यमंत्री झाले होते. सिद्धू आणि कॅप्टन यांच्यातील वादामुळे कॅप्टन यांना मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला आहे.

कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी राजीनामा देताना सिद्धू यांच्यावर जोरदार टीका केली आहे. सिद्धू यांना मुख्यमंत्री होवू देणार नसल्याचंही कॅप्टन म्हणाले आहेत. पक्षाला माझ्यावर आता विश्वास राहिला नसल्याची खंत सुद्धा कॅप्टन यांनी यावेळी व्यक्त केली आहे.

थोडक्यात बातम्या 

“मी वेळ देत नाही, ठाकरे सरकार कुठल्याही क्षणी पडेल”

‘नवज्योतसिंग सिद्धूंचे पाकिस्तानच्या लष्करप्रमुखांसोबत …’; अमरिंदर सिंग यांनी केले गंभीर आरोप

‘राहुल गांधी काँग्रेसच्या अध्यक्षपदासाठी इच्छुक नसतील तर…’; शशी थरूर यांचं मोठं वक्तव्य!

दिलासादायक! राज्यातील कोरोना रूग्णसंख्येत दिवसेंदिवस होतेय लक्षणीय घट

भारतीय संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी ‘हे’ पाच महारथी आघाडीवर, जाणून घ्या!

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More