नवी दिल्ली | राजधानीमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून शेतकरी आंदोलन चालू आहे. केंद्राने केलेले नवे कृषी कायदे रद्द करावेत, अशी मागणी ते करत असून ते आपल्या मागण्यांवर ठाम आहेत. शेतकरी आणि केंद्र सरकार यांच्यामध्ये अनेक बैठका झाल्या परंतू एकाही बैठकीत कोणताही तोडगा निघाला नाही. याच पार्श्वभमूीवर काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी मोदी सरकारवर जोरदार टीका केली आहे.
स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच इतकं गर्विष्ठ सरकार सत्तेत असं म्हणत त्यांनी मोदी सरकारला नवे कृषी कायदे कोणतीही अट घालता मागे घेण्यासाठी निवेदन केलं आहे.
आंदोलनातील काही शेतकऱ्यांनी आत्महत्येचा मार्ग पत्करला आहे. यामध्ये 50 शेतकऱ्यांनी आपला जीव गमावला आहे. मात्र असंवेदनशील मोदी सरकारचं हृदय द्रवलं नाही की आजवर पंतप्रधान किंवा त्यांच्या कुठल्याही मंत्र्याच्या तोंडून सांत्वनाचा एक शब्द निघाला नसल्याचं सोनिया गांधी यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, मोदी सरकारनं हे लक्षात ठेवायला हवं की, लोकशाहीचा अर्थ जनता आणि शेतकरी-कामगार यांच्या हिताचं रक्षण करणं आहे, असंही सोनिया गांधी म्हणाल्या.
थोडक्यात बातम्या-
“थोरातांना टिळक वाड्यात बसून छत्रपती संभाजीराजांचा इतिहास कळणार नाही”
औरंगाबादच्या नामंतरावरून ठाकरे सरकारमधील विरोधाभासावर अजित पवाराचं मोठं वक्तव्य; म्हणाले…
“औरंगाबादच्या नामांतराच्या वादातून ठाकरे सरकार कोसळणार”
‘मी ‘त्या’ पैशातून तीन कोटी 75 लाखांचं नवीन कार्यालय विकत घेतलं’; मातोंडकरांनी केला खुलासा
“ओबीसीला धक्का न लावता आम्हाला आरक्षण द्या”